Honey Trap : हनी ट्रॅप प्रकरण : महाजनांनी खडसेंच्या जुन्या जखमेवरील खपली काढली; निखिल खडसे मृत्यू प्रकरणाची पुन्हा चर्चा!

Nikhil Khadse Death CBI Investigation: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे आणि भाजप नेते गिरीश महाजन एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. राज्यभर चर्चेत असलेल्या हनी ट्रॅप प्रकरणावरून महाजन आणि खडसे दोन्ही नेते अक्षरशः एकमेकांवर तुटून पडले आहेत.
Eknath-Khadse-Girish-Mahajan
Eknath-Khadse-Girish-MahajanSarkarnama
Published on
Updated on

Honey Trap Case News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे आणि भाजप नेते गिरीश महाजन एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. राज्यभर चर्चेत असलेल्या हनी ट्रॅप प्रकरणावरून महाजन आणि खडसे दोन्ही नेते अक्षरशः एकमेकांवर तुटून पडले आहेत.

एकनाथ खडसे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन या प्रकरणावरून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.या प्रकरणातील प्रफुल्ल ओझा हा एकेकाळी जलसंपदा मंत्री महाजन यांचा विश्वासू सहकारी असल्यामुळे या वादाला तोंड फुटले.

खडसेंनी हनी ट्रॅप प्रकरण मुंबई ठाणे याबरोबरच नाशिक आणि आता जामनेर पर्यंत पोहोचले असून या प्रकरणात नाशिक आणि जामनेर शहरांचा उल्लेख झाल्याने शहराची बदनामी झाल्यामुळे या प्रकरणात सोक्षमोक्ष लागला पाहिजे, असे म्हटले होते.

Eknath-Khadse-Girish-Mahajan
Daund Firing : दौंडच्या कला केंद्रात गोळीबार करणारा भाऊ कोणत्या आमदाराचा? पहिल्यांदाच फुटलं नाव

खडसेंनी केलेल्या आरोपांना गिरीश महाजन यांनी देखील चोख प्रत्युत्तर दिलं. प्रफुल्ल ओझा हा सर्वपक्षीय नेता आहे. चौकशी करायचीच असेल तर मग निखिल खडसे मृत्यू प्रकरणाची ही चौकशी करायची का? असा प्रश्न महाजनांनी उपस्थित केला होता.

महाजनांच्या या वक्तव्यानंतर एकनात खडसेंनी मुलाच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करा, असं आव्हान महाजन यांना दिलं आहे. खडसे म्हणाले, "माझा एकुलता एक मुलगा मरण पावला. त्याचे दुःख माझ्या मनातून गेलेले नाही. महाजनला मुलगा नाही, त्यामुळे त्याला मुलाचे दुःख कळणार नाही.

Eknath-Khadse-Girish-Mahajan
PWD recruitment scam : ना जाहिरात, ना भरती प्रक्रिया! बनावट सह्यांद्वारे तब्बल 31 जणांना सरकारी नोकरी, PWD मधील धक्कादायक प्रकास उघडकीस

जर त्यांच्यात हिंमत असेल, तर या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, असं आव्हान दिलं. शिवाय निखिल खडसे यांच्या मृत्यूच्या वेळी आपण घरी नसल्याचं स्पष्टीकरण देखील खडसेंनी यावेळी दिलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com