Daund Firing : दौंडच्या कला केंद्रात गोळीबार करणारा भाऊ कोणत्या आमदाराचा? पहिल्यांदाच फुटलं नाव
Crime News : दौंडमधील वाखारी येथे न्यू अंबिका कला केंद्रात सोमवारी रात्री गोळीबार झाला होता. विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षातील आमदाराच्या भावाकडून गोळीबार करण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, 24 तास उलटूनही गुन्हा दाखल करण्यात आला होता. गोळीबार करणारा नेमका कोण हे समोर येत नव्हते. सोशल मीडियामध्ये या विषयी उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या.
अखेर न्यू अंबिका कला केंद्राचे मॅनेजर बाबासाहेब कंधारे यांनी यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर गोळीबार करणारा मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांचा भाऊ असल्याचे समोर आले आहे. यवत पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार बाळासाहेब मांडेकर, गणपत जगतपा, चंद्रकांत मारणे यांच्यासह आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेले सर्व संशयित हे मुळशी तालुक्यातीलच असल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेदहा ते 11 च्या सुमारास न्यू अंबिका काल केंद्रात आरोपींनी हवेत गोळीबार केला. या गोळीबारात कोणीही जखमी झाले नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी या गोळीबारात एक महिला जखमी झाल्याचा दावा करत पोलिसांनी हे प्रकरणाचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करू नये असे म्हटले आहे.
दिवसभर शिरुरच्या आमदाराची चर्चा...
सोमवारी रात्री गोळीबार झाल्याचे समोर आले. मात्र तो नेमका कोणी केला हे समोर येत नव्हते. पोलिसांनी वाखारी येथील तीनही कला केंद्रात जात चौकशी केली. मात्र, सर्वांनीच येथे असला कोणताही प्रकार घडला नसल्याचे सांगितले. तसेच पोलिसांनी तेथील सीसीटीव्ही फूटेज देखील जप्त केले. दरम्यान, या प्रकरणात आमदाराच्या भावाचा सहभाग असल्याचे समोर आल्याने शिरुरचे आमदार माऊली कटके यांचा भावाने अथवा निकटवर्तीयाने हे कृत्य केल्याची चर्चा होती. मात्र, अखेर कटके यांचा हा प्रकरणाशी काहीही संबंधन नसल्याचे समोर आले. आणि मुळशीचे आमदार मांडेकर यांच्या भावाचा यामध्ये सहभाग असल्याचे समजले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.