एकनाथ खडसेंना ६ वर्षांनी गुड न्यूज...विधान परिषदेची उमेदवारी जाहीर!

राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार.
Eknath Khadse News, Jalgaon News
Eknath Khadse News, Jalgaon NewsSarkarnama

जळगाव : माजी मंत्री एकनाथ खडसे (Ekknath Khadse) यांना अखेर सहा वर्षांनी गुड न्यूज मिळाली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) श्री. खडसे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली. आज ते उमेदवारी अर्ज दाखल करतील. गेले सहा वर्षे राजकीय संकटांची मालीका झेलणारे श्री. खडसे समर्थकांसाठी आजचा दिवस आनंद साजरा करण्याचा ठरला. (Eknath Khadse will submit his candidature form Today)

Eknath Khadse News, Jalgaon News
मला नगर जिल्ह्यात कोणी मित्र नाही

भारतीय जनता पक्षात दिर्घकाळ कार्यरत असलेल्या श्री. खडसे यांनी विविध पदांवर काम केले आहे. राज्यात २०१४ मध्ये भाजप-शिवसेना युतीचे सरकार स्थापन झाल्यावर ते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानले जात होते. मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे २०१६ मध्ये त्यांना महसूल व कृषी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांच्यामागे `इडी`चे शुक्लकाष्ठ लागले. पुढे २०१९ मध्ये भाजपने त्यांना उमेदवारी नाकारली. त्यांच्या कन्या रोहिनी खडसे यांना उमेदवारी मिळाली, मात्र त्यांचा पारभव झाला. त्यानंतर `इडी`कडून त्यांना सातत्याने विविध चौकशीसाठी नोटीस येत राहिल्या. दरम्यान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राज्यपाल नियुक्त विधानसभेच्या बारा सदस्यांत त्यांचे नाव होते. मात्र राज्यपालांनी त्याला मंजुरी दिली नाही. या सहा वर्षांच्या राजकीय संकटांच्या मालिकांत विधानपिरषदेची त्यांची उमेदवारी राजकीय वाळवंटात ओअॅसीस ठरले आहे. त्यांच्या समर्थकांसाठी ही सेलीब्रेशनची संधी आहे. (Eknath Khadse News)

Eknath Khadse News, Jalgaon News
शिवसेनेचे आमदार मुक्कामी असलेल्या हॉटेलात शेलार गेले अन् केसरकरांशी बोललेही!

राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे याना पक्षाने विधान परिषद उमेदवारी जाहीर केली आहे. आज ते अर्ज दाखल करणार आहेत. खडसे यानीही त्याला दुजोरा दिला आहे. पक्षाकडून सकाळी त्यांना दुरध्वनीवरून ही माहिती देण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विधान परिषदेच्या दोन जागा आहेत. पक्षातर्फे विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर याना पुन्हा संधी देण्यात आली आहे. दुसरे उमेदवारी एकनाथ खडसे आहेत. याबाबत श्री. खडसे यांनी `सरकारनामा`ला सांगितले की, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्याला उमेदवारीबाबत कळविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे निंबसळकर व आपण आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत.

श्री. खडसे पाच वेळा भारतीय जनता पक्षातर्फे विधानसभेवर मुक्ताईनगर मतदारसंघातून निवडून गेले आहेत. मात्र २०१९ मध्ये भाजपने त्यांना उमेदवारी नाकारली. त्या नंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपाल नियुक्त आमदार पदासाठी त्यांचे नाव दिले होते. मात्र राज्यपालांनी त्या यादीला मंजुरी दिली नाही. खडसे यांनी १९९८ मध्ये युती सरकारच्या काळात जलसंपदा, अर्थमंत्री पद भूषविले होते. २०१४ मध्ये राज्यात खात्याचे मंत्री त्यांना केले होते. मात्र त्यांची नाराजी कायम होती. तेथूनच पुढे तत्कालीन मुखमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांचे बिनसले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com