Eknath Khadse : महाजनांच्या घराची बेल वाजली... अखेर एकनाथ खडसेंच्या वाढदिवसाचं निमंत्रण पोहचलं ; 'कार्यक्रमाला या' म्हणत हात जोडून आग्रह

Eknath Khadse Invites Girish Mahajan to Amrut Mahotsav Celebration : अखेर राजकीय वैर बाजुला ठेऊन एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांना वाढदिवसाचं निमंत्रण धाडलं आहे.
Eknath Khadse Invites Girish Mahajan to 75th Birthday
Eknath Khadse Invites Girish Mahajan to 75th BirthdaySarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जेष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी खडसेंच्या स्वीय सहाय्यकांनी थेट गिरीश महाजन यांचे घर गाठल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

खडसे यांच्या भाजपमधील संभाव्य घरवापसीच्या चर्चांनी गेल्या काही दिवसांपासून जोर धरला आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर खडसेंच्या घरवापसीच्या चर्चा सुरु झाल्या. मंत्री महाजन यांच्या गटाचा मात्र, खडसेंच्या संभाव्य भाजप प्रवेशाला विरोध असल्याचं बोललं जात आहे. असे असताना आता खडसेंनी आपल्या वाढदिवसाचे निमंत्रण महाजन यांना दिल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा रंगल्या आहेत.

एकनाथ खडसे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अमृत महोत्सवी सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. २ सप्टेंबर रोजी मुक्ताईनगरमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी खडसेंकडून राजकीय पक्षातील राष्ट्रीय व राज्यस्तरीय नेत्यांना निमंत्रित करण्यात येत आहे. या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात या कार्यक्रमाची चर्चा आहे.

Eknath Khadse Invites Girish Mahajan to 75th Birthday
Eknath Khadse : खडसेंच्या भाजपमधील घरवापसीवर गिरीश महाजनांना काहीच अडचण नाही? नेमकं काय म्हणाले..

अशात एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांचे राजकीय वैर सर्वश्रुत असताना खडसे महाजन यांना निमंत्रण देतील की नाही याकडे राज्याचे लक्ष लागले होते. अखेरीस, एकनाथ खडसे यांचे स्वीय सहाय्यक योगेश कोलते आणि सुनील नेवे यांनी जामनेर येथे मंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेत त्यांना अमृत महोत्सवी कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका दिली आहे.

खडसेंच्या दोन्ही सहाय्यकांनी महाजन यांना तुमच्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होणार नाही, असे सांगत आग्रहाचे निमंत्रण दिले. त्यांनी महाजन यांना अत्यंत आदराने हात जोडून, सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहावे, अशी विनंती केली. त्यावर प्रतिक्रिया देताना, "सगळ्यांचा विषय वेगळा आणि माझा विषय वेगळा आहे." असं मिश्किलपणे महाजन म्हणाले.

Eknath Khadse Invites Girish Mahajan to 75th Birthday
Eknath Khadse News: तावडेंच्या भेटीनंतर पुन्हा भाजपप्रवेशाच्या चर्चा, आता एकनाथ खडसेंच्या 'पंचाहत्तरी'च्या कार्यक्रमाला अमित शाह उपस्थित राहणार?

या सोहळ्याला सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे तुम्हीही यावं. स्वागत समितीत आम्ही तुमचे नाव समाविष्ट करतो. असं खडसेंच्या स्वीय सहाय्यकांनी महाजन यांना सांगितलं. त्यावर गिरीश महाजन म्हणाले, "समितीत माझं नाव नको, तुम्हाला तर सगळी पार्श्वभूमी माहितीच आहे.

दरम्यान, मंत्री महाजन यांनी संपूर्ण निमंत्रण पत्रिका उघडून अत्यंत बारकाईने बघितली. विशेष म्हणजे, त्यांनी तोंडी कोणतीही स्पष्ट कबुली न देता, हसतमुखाने मान डोलवत कार्यक्रमाला येण्याबाबत प्रतिसाद दिला.

दरम्यान, राजकीय वैर बाजूला ठेवून खडसेंनी महाजनांना निमंत्रण धाडलं आहे. यापूर्वी निमंत्रण मिळाले तर कार्यक्रमाला जाण्याबाबत विचार करू असं महाजनांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं. त्यामुळे आता एकनाथ खडसेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात गिरीश महाजन उपस्थित राहणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com