Eknath khadse Politics: राष्ट्रवादी ना भाजप एकनाथ खडसे फक्त त्यांच्या कुटुंबात!

Eknath khadse politics, MLA Chandrakant Patil criticize khadse, politics on Bodwad water scheme-आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांना पाणी प्रश्नावरून डिवचले
Eknath Khadse & Chandrakant Patil
Eknath Khadse & Chandrakant PatilSarkarnama
Published on
Updated on

Chandrakant Patil News: बोदवड शहराच्या पाणी प्रश्नांवरून सातत्याने आमदार चंद्रकांत पाटील ज्येष्ठ नेते खडसे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. या निमित्ताने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता पाणी प्रश्नावरून या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय वादविवाद सुरू झाला आहे.

बोदवड शहराची पाणीपुरवठा योजना लवकरच कार्यान्वित होत आहे. त्यासाठी आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रित केले आहे. यावरून आता राजकीय वादाला तोंड फुटले आहे.

बोदवड शहरासाठी ९२ कोटी रुपये खर्चाची पिण्याच्या पाण्याची योजना पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता या शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच त्याचे लोकार्पण करण्याचा घाट घातला आहे.

याबाबत आमदार पाटील यांनी खडसे यांना चिमटा घेतला आहे. ते म्हणाले, मतदारसंघातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे याला देखील खडसे का विरोध करतात. मतदारसंघातील जनतेला पाणीही मिळू नये असे त्यांना वाटते.

Eknath Khadse & Chandrakant Patil
Raj Thackrey Politics: मनसेचे तब्बल १८० पदाधिकारी, शहरप्रमुखाला पदाधिकाऱ्याची नावे तरी आठवतील का?

एकनाथ खडसे यांना त्यांनी राजकीय चिमटाही घेतला. ते म्हणाले, श्री. खडसे कधी म्हणतात मी भाजप पक्षात आहे, तर कधी सांगतात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. माझे मत आहे की, श्री खडसे ना भाजप ना राष्ट्रवादी, ते फक्त आपल्या कुटुंबात आहेत. आपल्या कुटुंबासाठीच ते सबंध राजकारण करतात. जनतेच्या प्रश्नांवर त्यांना काहीही देणे-घेणे नाही.

आमदार पाटील यांनी डीवचल्याने ज्येष्ठ नेते खडसे यांनीही त्यांना आव्हान दिले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या योजनेवरून आमदार पाटील आणि खडसे यांच्या चांगलेच आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. श्री खडसे यांनी आमदार पाटील यांना आव्हान देत, या योजनेला पाच वर्षे का लागली? असा प्रश्न केला आहे.

निवडणुकीच्या तोंडावरच ही योजना पूर्ण केल्याचा दावा खरा आहे का? अशी चारना खडसे यांनी केली. आमदार पाटील यांनी ९२ कोटींची योजना केली तर, त्याचा ते किती गवगवा करीत आहेत. मात्र मी अशा अनेक योजना केल्या आहेत. मतदारसंघाच्या विकासासाठी अनेक प्रकल्प केल्याचेही त्यांनी सांगितले.

Eknath Khadse & Chandrakant Patil
RPI (A) Politics: राज्यमंत्री रामदास आठवले अडचणीत, पक्षाचा नेताच कुंटणखाण्याचा मास्टर माईंड?

खडसे यांच्या कारकिर्दीत दोन हजार २२८ कोटींची "पुरा", तीन हजार ३६४ कोटींची "उसका", ९६० कोटींची वरणगाव उपसा योजना अशा एकाच वेळी हजारो कोटींच्या योजना मंजूर झाल्या आहेत. या योजना कार्यान्वित देखील झाल्या. मात्र गेल्या पाच वर्षात बोदवड उपसा सिंचन योजना का सुरू होऊ शकली नाही? याचे उत्तर आमदार पाटील देतील का?, असे खडसे म्हणाले.

या मतदारसंघात अधिक चांगला विकास शक्य होता. मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले आहे. माझ्या कारकिर्दीत बोदवड आणि मुक्ताईनगर नगरपंचायतीचे निर्मिती झाली. या भागाच्या विकासासाठी अनेक योजना आल्या. त्यामुळे मी अशा किरकोळ योजनांबाबत फारसे काही बोलणार नाही, असा टोमणा खडसे यांनी आमदार पाटील यांना मारला.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com