Eknath Khadse Politics: धक्कादायक, ३०० कोटींचा 'आरटीओ' घोटाळा; खडसेंचा थेट फडणवीसांना प्रश्न!

Shocking 300 Crore RTO Scam Eknath Khadse Questions Fadnavis: जळगाव आणि खानदेशात सहा 'आरटीओ'ची नियमबाह्य तपासणी नाके कार्यरत?
Devendra Fadanvis & Eknath Shinde
Devendra Fadanvis & Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Khadse vs Fadnavis: जळगाव आणि खानदेशच्या आंतरराज्य सीमेवर 'आरटीओ'चा मोठा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. नियमबाह्य पद्धतीने सहा तपासणी सुरू ठेवण्यासाठी निवृत्त अधिकाऱ्यांनी संबंधित मंत्र्यांना मोठी ऑफर दिल्याचा दावा केला जात आहे. या बातमीने मोठी खळबळ उडाली आहे.

या संदर्भात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र लिहिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही तपासणी नाके १५ एप्रिल पर्यंतच सुरू राहतील, असे सांगितले होते. त्याची अंमलबजावणी होऊ नये यासाठी मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे बोलले जाते.

Devendra Fadanvis & Eknath Shinde
Manikrao Kokate Politics: कृषिमंत्री कोकाटे यांच्या अडचणी कमी होईनात... आता अजित पवारांची नाराजी?

केंद्र सरकारने २०१७ मध्ये जीएसटी कायदा लागू केला त्यानंतर देशात "वन नेशन, वन टॅक्स" लागू करण्यात आले. या निर्णयामुळे देशातील अन्य राज्यांनी ही तपासणी नाटके बंद केली. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने देखील सीमेवरील प्रादेशिक परिवहन विभागाची ही सहा तपासणी नाके बंद करणे अपेक्षित होते. मात्र तसे झालेले नाही.

जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर येथे कर्की, चोरवड, नंदुरबार जिल्ह्यात नवापूर तसेच हाडाखेड, बोरगाव आणि गवाली अशी सहा 'आरटीओ' ची नाके आहेत. कर्की नाका खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघात येतो. ठिकाणी ओव्हरलोड या नावाखाली प्रत्येक ट्रक कडून दोन हजार रुपयाची वसुली केली जाते, असा दावा आहे. श्री खडसे यांनी स्वतः या नाक्यावर धाड घालून अधिकाऱ्यांना पकडून दिले होते.

आता या तपासणी नाक्यांमध्ये प्रादेशिक परिवहन विभागाच्या निवृत्त अधिकाऱ्यांनी रस घेतला आहे. अधिकाऱ्यांच्या एका टीमने याबाबत शासनाशी विविध बैठका घेतले आहेत. ही नाकी सुरू ठेवून त्यातून तीनशे कोटी रुपयांची खंडणी जमा करण्याचे उद्दिष्ट आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली काय भूमिका आहे. हे जाहीर करावे, असे आव्हान खडसे यांनी दिले आहे.

राज्यातील प्रादेशिक परिवहन विभाग अनेकदा गैरकारभारामुळे चर्चेत असतो. थेट केंद्र शासनाचा कायदा गुंडाळून ठेवून सहा तपासणी नाके सुरू ठेवण्याचा घाट या विभागाने घातला आहे. त्यात निवृत्त अधिकाऱ्यांची मोठी भूमिका आहे. पडद्यामागून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू आहेत. त्यात जवळपास ३०० कोटी रुपयांचे रॅकेट असल्याचा दावा केला जातो.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com