Eknath Khadse Heart Attack News : एकनाथ खडसेंना हृदयविकाराचा झटका; हवाई अॅम्ब्युलन्सने हॉस्पिटलला...

Eknath Khadse Heart Attack News : "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासाठी हवाई रुग्णवाहिकेची.."
Eknath Khadse Heart Attack News :
Eknath Khadse Heart Attack News : Sarkarnama
Published on
Updated on

Eknath Khadse Heart Attack News : राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेवरील आमदार व भाजपच्या पूर्वाश्रमीचे नेते एकनाथ खडसे यांनी हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर येत आहे. झटका आल्यानंतर त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Eknath Khadse Heart Attack News :
Katewadi Grampanchayat Elections ; सुनेत्रा पवारांनी ठणकावूनच सांगितलं | Sunetra Pawar on NCP |

साम टीव्ही या वृत्तवाहिनेने यासंदर्भात वृत्त दिले आहे. ही बातमी कळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासाठी हवाई रुग्णवाहिका (Air Ambulance) उपलब्ध व्हावी, यासाठी तातडीने प्रयत्न केले. त्यांना सायंकाली मुंबईतील रुग्णालयात नेण्यात येणार आहे. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एकनाथ खडसे यांची मुलगी कन्या रोहिणी खडसे यांचा आणि मुख्यमंत्र्यांचा संपर्क झाला आहे. या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी तातडीने हवाई रुग्णवाईकेची व्यवस्था केल्याची माहिती समोर आली आहे. खडसे यांना उरचारासाठी मुंबईला दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Eknath Khadse Heart Attack News :
C Voter Survey MP Election : मध्य प्रदेशात भाजप सत्ता गमावणार ? ताज्या सर्व्हेत काँग्रेसला अच्छे दिन!

दुपारच्यावेळी एकनाथ खडसे यांना छातीमध्ये वेदना जाणवत हाेती. त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. खडसेंना सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याची समजते. आता त्यांना उपचारासाठी मुंबईत दाखल करण्यात येणार आहे . मुख्यमंत्र्यांनी या संबंधित सूचना दिलेल्या आहेत. आज संध्याकाळी ७.३० वाजता खडसेंना पुढील उपचारासाठी जळगावहून मुंबईला रवाना करण्यात येणार आहे.

खडसे यांची तब्येत सध्या स्थिर आहे,आम्ही तपासणी केली काहीही काळजी करण्यासारखे नाही.त्यांनी गप्पा केल्या परंतु पुढील तपासणीसाठी मुंबई येथे नेले जात आहे. अशी माहिती जळगाव येथील डॉ.विवेक चौधरी यांनी दिली आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com