Eknath Khadse Vs Girish Mahajan : राजकीय नेत्यांमध्ये पुन्हा पेटापेटी; मंत्री महाजनांच्या मालमत्तेची यादी खडसे मुख्यमंत्र्यांना देणार

Eknath Khadse to File Complaint with CM Devendra Fadnavis Against BJP Minister Girish Mahajan Over Property in Jalgaon : जळगावमधील एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील राजकीय वाद विकोलापा गेले आहेत.
Eknath Khadse Vs Girish Mahajan
Eknath Khadse Vs Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon political controversy : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि भाजप मंत्री गिरीश महाजन यांच्यातील राजकीय युद्ध चांगलंच पेटलं आहे.

दोघांमधील शत्रुत्व दिवसेंदिवस वाढत असून, एकमेकांना शह देण्याची संधी दोघंही नेते सोडत नाहीत. आता पुन्हा या दोघांमध्ये जुंपली असून, एकमेकांची ऊणीधुणी काढत आहेत.

मी मोठ्या जमीनदाराचा मुलगा असून, माझ्याकडे वडिलोपार्जित भरपूर शेती आहे. त्यांचे वडील साधे शिक्षक असताना ते इतके मोठे कसे झाले, असा प्रश्न करत एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी गिरीश महाजनांना डिवचलं होतं. त्यावर महाजनांनी जोरदार पलटवार केला. संपूर्ण राज्याला माहिती आहे, की कोण तुरूंगात गेले तसेच कोण चोऱ्या करत आहे. तसेच दिल्लीला जाऊन कोणी माफी मागून लोटांगण घातलं, अशा शब्दात महाजनांनी खडसेंना सुनावलं. यावर खडसे पुन्हा आक्रमक झाले असून, महाजनांना पुन्हा डिवचलं आहे.

खडसे यांनी मला लोटांगण घालण्याची आवश्यकता नाही, तुमच्या वरिष्ठांशी आजही माझे चांगले संबंध आहेत. माझ्या घरात केंद्रीय मंत्री आहे, मला लोटांगण घालण्याची काय गरज? असा टोला महाजनांना लगावला आहे. गिरीश महाजन यांनी कमावलेले कोट्यवधींची मालमत्तेची यादी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे देणार आहे, असा सूचक इशारा खडसेंनी दिला.

Eknath Khadse Vs Girish Mahajan
Ahilyanagar Crime : मेकॅनिकल, केमिकल इंजिनीयर, पीएच.डीधारकाचं 'क्रिमिनल माइंड्स'; एक ग्रॅम क्रिस्टलपासून बनवली हजारो लीटर कृत्रिम ताडी

मी कुठल्याही मुरूम चोरीचा प्रकार केला नाही, महाजन यांचीच प्रवृत्ती खोटे गुन्हे दाखल करण्याची आहे. 'ईडी'चाही खोटा गुन्हा दाखल करण्याचे काम केले. माझं राजकीय करिअर संपवण्यासाठी हे कुणी केलं, कसा गुन्हा दाखल केला, हे सर्वांना माहिती आहे. गिरीश महाजन हे मुळ मुद्द्यावरून मागे फिरताय, महामार्गाच्या जमिनीच्या मोबदल्याच्या मी जमीन आता घेतलेली नाही. माझ्या वडिलोपार्जित जमिनी आहेत, असा दावा देखील एकनाथ खडसेंनी केला.

Eknath Khadse Vs Girish Mahajan
Jayant Patil Politics : जयंत पाटलांच्या 'त्या' कृतीनं उडाला राजकीय धुरळा; पुन्हा महायुतीत जाण्याच्या चर्चांना उधाण

मी महाजनांना 100 एकराचे उतारे देखील दाखवतो. त्या उलट यांचे वडील शिक्षक असताना हजारो कोटीची मालमत्ता तुमच्याकडे आली कशी? ठिकठिकाणी मालमत्ता तुम्ही कशा घेता? मी दिल्लीला जाऊन कधीही लोटांगण घातलेला नाही, मी लोटांगण घातलं असतं तर माझ्यावरील ईडी कधीच निघून गेली असती. माझ्या कुटुंबाचं वाटोळ करण्याचं काम या लोकांनी केलं. महाजनांच्या प्रॉपर्टीची चौकशी अँटी करप्शनमार्फत करावी, अशी मागणी देखील एकनाथ खडसेंनी केली.

पुणे-मुंबई-जामनेर असा अनेक ठिकाणी महाजनांची मालमत्ता आहे. ही कुठून अन् कशी आली. गिरीश महाजन अनेक गुन्ह्यात अडकले असते, तर मी त्यांना मदत केली असती. गिरीश महाजन हा माझा बोट धरून मोठा झाला, हे जगाला माहिती आहे. बंदुकीचे प्रकरण, अर्धापूरचं प्रकरण या विषयांमध्ये मी त्यांना वाचवलं. गिरीश महाजन यांच्या संपत्तीचा विवरण दाखवावे, असे आव्हान देखील खडसेंनी महाजनांना दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com