नाथाभाऊ गेले कोलकत्यात भक्ती-शक्तीच्या दारी..

राष्ट्रवादीचे (NCP) नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे सध्या आपल्या पत्नीसमवेत देवदर्शनासाठी कोलकत्याच्या दौऱ्यावर आहेत.
Eknath Khadse & Mandakini Khadse

Eknath Khadse & Mandakini Khadse

Sarkarnama

Published on
Updated on

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे कमालीचे श्रद्धाळू आहेत हे सर्वश्रुत. या श्रद्धेपोटी ते दरवर्षी देशातील विशिष्ट धार्मिक स्थळ, तीर्थक्षेत्रांना भेट देत असतात. त्यांच्या भक्तीमार्गात दरवर्षीचे कोलकात्याच्या कालिकामातेचे पुरातन मंदिर हे ठिकाण असतेच. सध्या खडसे हे त्यांच्या पत्नी मंदाकिनी यांच्यासह पश्‍चिम बंगालमध्ये आहेत. दरवर्षाच्या परंपरेनुसार त्यांनी यंदाही कालिकामातेच्या पायी माथा टेकून दर्शन घेतले व आशिर्वाद घेतले.

<div class="paragraphs"><p>Eknath Khadse &amp; Mandakini Khadse</p></div>
कोलकत्याच्या महापौरपदाची धुरा ममतांचे विश्वासू मंत्री सांभाळणार

खडसे हे संत मुक्ताईचे निस्सीम भक्त आणि वारकरी म्हणून त्यांचा लौकिक आहे. त्यांच्या घराण्याला वारकरी संप्रदायाचा वारसा आहे. संत मुक्ताईच्या यात्रोत्सवात त्यांना अनेकदा कीर्तन करताना तल्लीन झाल्याचे अनेकांनी अनुभवलेले आहे. तर, आकाशवाणी वरून त्यांच्या कीर्तनाचे कार्यक्रमही झाले आहेत. दरवर्षी काही विशिष्ट धार्मिक स्थळांना भेट देऊन ते देवदर्शन करीत असतात. यंदा ते पश्‍चिम बंगाला गेले असून कोलकाता येथील कालिकामातेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याची माहिती मिळाली आहे.

<div class="paragraphs"><p>Eknath Khadse &amp; Mandakini Khadse</p></div>
छत्रपती संभाजीराजेंना 'राष्ट्र प्रतिक' म्हणून ओळख द्या..

सरत्या 2021 वर्षाला निरोप देत व नवीन वर्षात प्रवेश करताना आपल्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांचे व जनतेचे दु:ख आणि संकटे संपवून सर्वांना शक्ती व बुध्दी दे, सर्वांचे कल्याण व मंगल कर, अशी प्रार्थना त्यांनी भक्ती व शक्तीच्या देवी कालिकामातेकडे केली आहे. त्यांच्या या देवदर्शनाबद्दलची माहिती त्यांच्यासोबत देवदर्शनासाठी असलेले प्रा. सुनील नेवे यांनी माहिती शेअर केली आहे. यावेळी त्यांच्या सोबत गोर्वधन जगवानी, विनीता नेवे, अटल नेवे आहेत.

दरम्यान, नुकताच खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसेंना यांना न्यायाकडून दिलासा मिळाला आहे. पिंपरी-चिंचवड येथील भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी मंगळवारी (ता. 21डिसेंबर) अटक पूर्व जामीनावर सुनावनी झाली. या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाकडून त्यांना दिलासा मिळाला असून त्यांना आता 12 जानेवारीपर्यंत अटक करता येणार नाही, असा असे न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी पुढील वर्षात 12 जानेवारीला होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com