Eknath Khadse News : एकनाथ खडसे 'या' कारणामुळे जाणार नाहीत जळगावमधील पीएम मोदींच्या कार्यक्रमास

Political News : जळगावमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रविवारी दुपारी 12 वाजता प्राईम इंडस्ट्रीयल पार्कवर लखपती दीदी संमेलन पार पडणार आहे. या कार्यक्रमास एकनाथ खडसे जाणार नसल्याचे समजते.
Eknath Khadse P
Eknath Khadse Sarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News : लोकसभा निवडणुकीपासून भाजपसोबत असलेल्या माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश गेल्या काही दिवसापासून रखडलेला आहे. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांचा भाजप प्रवेश होणार की नाही याची उत्सुकता लागली असतानाच रविवारी जळगावमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रविवारी दुपारी 12 वाजता प्राईम इंडस्ट्रीयल पार्कवर लखपती दीदी संमेलन पार पडणार आहे. या कार्यक्रमास एकनाथ खडसे जाणार नसल्याचे समजते.

एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या नाराजीचे कारण पुढे आले आहे. त्यांना या कार्यक्रमाचे रीतसर आमंत्रण देण्यात आले नाही. या कार्यक्रमाचे मला वेळेत निमंत्रण असते तर मी या कार्यक्रमाला जाणार होतो. मात्र, आता निमंत्रण मिळालं तरी मी कार्यक्रमाला जाणार नाही, असे एकनाथ खडसे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

जळगाव येथे होत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना निमंत्रण न दिल्याच्या मुद्द्यावरुन राजकारण रंगले आहे. शासकीय कार्यक्रम असल्यामुळे सर्व आमदारांना कार्यक्रमाचे निमंत्रण देणे बंधनकारक होते. असे असताना एकनाथ खडसे यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त करीत या कार्यक्रमाला जाणार नसल्याचे सांगितले.

जळगाव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रविवारी दुपारी 12 वाजता प्राईम इंडस्ट्रीयल पार्कवर लखपती दीदी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. मोदी सकाळी 10 वाजता छत्रपती संभजीनगर विमानतळावर दाखल होतील. जळगावात सकाळी 11.15 ते 12 या वेळेत ते बचत गटाच्या महिलांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते इंडस्ट्रीयल पार्कवरी कार्यक्रमस्थळी पोहचणार असल्याचे समजते

Eknath Khadse P
MVA News : 'मुंबईत शिवसेना ठाकरे गटच मोठा भाऊ', मविआच्या बैठकीनंतर शरद पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान, काँग्रेसला डिवचलं?

दरम्यान, दुसरीकडे लोकसभा निवडणुकीपासून एकनाथ खडसे हे भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील, अशी चर्चा आहे. त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश झालेला नाही. त्यातच आता पीएम मोदींच्या कार्यक्रमाला न बोलावल्याने एकनाथ खडसे हे नक्की भाजपमध्ये की शरद पवार गटात? हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

Eknath Khadse P
MVA News : मविआत तिढा, नवाब मलिकांच्या विरोधात कोण उमेदवार असणार? ठाकरे गटाची मोठा मतदारसंघ सोडण्याची तयारी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com