MVA News : 'मुंबईत शिवसेना ठाकरे गटच मोठा भाऊ', मविआच्या बैठकीनंतर शरद पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान, काँग्रेसला डिवचलं?

MVA Shivsena NCP Jitendra Awhad : मुंबईमध्ये विधानसभेच्या 36 जागा आहेत. ठाकरे गटाकडून आजच्या बैठकीत 20 ते 25, राष्ट्रवादीने 7, तर काँग्रेसने 14 जागांचा प्रस्ताव मांडल्याची माहिती आहे.
Sharad Pawar, Nana Patole, Uddhav Thackeray
Sharad Pawar, Nana Patole, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

MVA News : मुंबईतील विधानसभा जागांच्या संदर्भात आज (शनिवारी) महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईत शिवसेना हा मोठा भाऊ आहे आणि राहिलं. लोकसभेत देखील शिवसेनाच मोठा भाऊ होता, असे विधान केले.

मुंबईमध्ये विधानसभेच्या 36 जागा आहेत. ठाकरे गटाकडून आजच्या बैठकीत 20 ते 25, राष्ट्रवादीने 7, तर काँग्रेसने 14 जागांचा प्रस्ताव मांडल्याची माहिती आहे.

सर्वच पक्ष जास्तीत जास्त जागा मिळण्यासाठी आग्रही असल्याने माघार कोण घेणार, याची उत्सुकता असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आजच्या बैठकीत ठाकरे गटाने त्यांना 20 मिळाव्यात तर राहिलेल्या जागा दोन्ही पक्षांनी वाटून घ्याव्यात, असे सुत्र मांडले आहे.

अणूशक्तीनगर जागेवर तीनही पक्षांनी दावा सांगितला आहे. दरम्यान, जागावाटप ठरलं की ते जाहीर करू, असे आव्हाड म्हणाले.

Sharad Pawar, Nana Patole, Uddhav Thackeray
Manoj Jarange Patil : कोणाला निवडून देण्याचा आम्ही ठेका घेतलेला नाही ; जरांगेंचा रोख कोणाकडे ?

जितेंद्र आव्हाड म्हणाले, शिवसेना मोठा भाऊ आहे. आक्षेप घेण्याचे कारण नाही. आजच्या बैठकीत राजकीय चर्चा जास्त झाली नाही. आम्ही बदलापूर प्रकरणाची चर्चा केली. बदलापूर कांड भयंकर आहे. या प्रकरणानंतर जे माता पिता समोर येऊन बोलत आहे. पोलिसांमध्ये तक्रार देत आहेत. त्यांनी मी सलाम करतो.

काँग्रेस 13 ते 15 जागांसाठी आग्रह

शिवसेना ठाकरे गट 20 ते 22 जागांसाठी आग्रही असल्याची माहिती असताना काँग्रेसने देखील 13 ते 15 जागांसाठी आग्रह धरला आहे. काँग्रेसची देखील मुंबईत ताकद असल्याचे काँग्रेस नेते सांगत आहेत.

Sharad Pawar, Nana Patole, Uddhav Thackeray
Video Ladki Bahin Yojana : यवतमाळमध्ये मुख्यमंत्र्याचं भाषण सुरु असतानाच 'लाडक्या बहिणीं'चा गोंधळ, नेमकं काय घडलं?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com