Eknath Shinde Group politics : भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी विविध उपक्रमांवर भर दिला आहे. त्यात बूथप्रमुखांना महत्त्वाचे स्थान आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन शिवसेनेच्या शिंदे गटानेदेखील शिवदूत योजना आखली आहे. (Shivsena (Shinde Group) will opens a new 500 party branches)
खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी सध्या मतदारसंघातील जनसंपर्कावर (Eknath Shinde Group) भर दिला आहे. त्यात थेट मतदार व कार्यकर्ते यांच्या भेटीगाठींवर भर देण्यात आला आहे. भाजप (BJP) आणि शिवसेनेला (Shivsena) तोंड देण्यासाठी ही योजना आहे.
यासंदर्भात खासदार गोडसे म्हणाले, येत्या डिसेंबरअखेर काय काय करायचे याचे नियोजन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तयार केले आहे. मी स्वतः संबंध मतदारसंघांचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात मंजूर व पूर्ण झालेल्या सर्व कामांची उद्घाटने करण्यात येतील.
पक्षाचे पदाधिकारी ५०० नव्या शाखा सुरू करतील. बूथप्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत. त्यावर विशेष लक्ष देण्यात येईल. सध्या नाशिक शहरातील पूर्व, मध्य आणि पश्चिम या तीन मतदारसंघांसाठी १८०० शिवदूत नियुक्त केले आहेत. उर्वरित सिन्नर, इगतपुरी आणि देवळाली मतदारसंघांसाठीदेखील शिवदूत नियुक्त करण्याचे काम सुरू आहे. शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना जनतेला सांगण्याचे काम ही यंत्रणा करेल. त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात येईल.
नाशिक मतदारसंघात शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) खासदार हेमंत गोडसे आहेत. त्यांना तेथून पुन्हा तयारी करण्यास पक्षाच्या वरिष्ठांनी अगोदरच सांगितले आहे. त्यामुळे तेदेखील सक्रिय झाले आहेत. शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनीही या मतदारसंघात जातीने लक्ष घालणे सुरू केले आहे. कारण पक्षफुटीनंतर एकनाथ शिंदे गटाला साथ दिलेले जिल्ह्यातील आमदार दादा भुसे आणि सुहास कांदे हे शिवसेनेच्या निशाण्यावर आले आहेत.
शिवदूत ही बिगरराजकीय कार्यकर्त्यांची फळी उभारण्याचा संकल्प आहे. प्रत्येक भागात शिवसेना (एकनाथ शिंदे) ग्रुपचे शिवदूत नियुक्त करण्यात आले आहेत. ते थेट मतदारांच्या संपर्कात असतील. त्यामुळे पक्षाने केलेल्या कामकाजाची माहिती मतदारांपर्यंत पोचविली जाईल.
- अजय बोरस्ते, जिल्हाप्रमुख, शिवसेना (शिंदे गट).
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.