Eknath Shinde Jalgaon Daura: आता मुख्यमंत्री शिंदेंची बारी; पाचोऱ्यातून उद्धव ठाकरेंच्या बोचऱ्या टीकेला काय उत्तर देणार ?

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: वारंवार पुढे ढकललेल्या शिंदेंच्या कार्यक्रमाला ठाकरेंच्या सभेनंतर लगेच मिळाली तारीख
Eknath Shinde, Uddhav Thackeray
Eknath Shinde, Uddhav ThackeraySarkarnama

Jalgaon Political News : राज्याचे राजकीय वातावरण वार-पलटवारांनी तापले आहे. एकाने टीका केली तर त्याच ठिकाणावरून प्रत्युत्तर देण्याची प्रथा पडल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान, जळगाव येथून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली होती. आता मंगळवारी जळगाव येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा आहे. या वेळी शिंदे हे ठाकरेंना काय उत्तर देणार, याकडे लक्ष आहे. (Latest Political News)

'एकनाथ शिंदे बेकायदा मुख्यमंत्री आहेत. ते कायम दिल्लीत जाऊन मुजरा करतात. जाे बायडन यांना शिंदे भेटले, पण त्यांच्याशी काय बोलले हे त्यांनाच कळले नसेल,' अशी बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी जळगाव (Jalgaon) येथील जाहीर सभेत मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केली होती. ठाकरेंची सभा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या पाचोऱ्यातील चार वेळा पुढे ढकलेल्या 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाला लगेच तारीख मिळाली. यानुसार शिंदे मंगळवारी पाचोरा येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित असणार आहे. या वेळी ते ठाकरेंना काय उत्तर देणार, याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

Eknath Shinde, Uddhav Thackeray
Pimpri Chinchwad Politics : पवना बंद जलवाहिनीचे राजकारण; बंदी उठताच भाजप अन् राष्ट्रवादीत श्रेयवाद उफाळला

जळगाव जिल्हा सप्टेंबर महिना मोठ्या राजकीय नेत्यांच्या सभांनी गाजत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची ५ सप्टेंबरला सभा झाली. त्यांनी राज्यातील व केंद्रातील सरकारवर जोरदार टीका केली. त्यानंतर १० सप्टेंबरला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची सभा झाली. त्यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शाब्दिक आसूड ओढत समाचार घेतला, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही खिल्ली उडवली. याच सभेत खासदार संजय राऊत यांनी जिल्ह्यातील बंडखोरी करणाऱ्या जिल्ह्यातील शिवसेनेच्या चार आमदारांना टकले, असे संबोधले होते. (Maharashtra Political News)

आता मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पाचोरा येथे मंगळवारी दुपारी 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम होणार आहे. तालुका स्तरावर होणारा हा राज्यातील पहिलाच कार्यक्रम आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री शिंदे, काही मंत्री असणार असून, दोन्ही उपमुख्यमंत्री मात्र उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे. आजच्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला कसे उत्तर देणार याकडे जळगावसह राज्याचे लक्ष आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Eknath Shinde, Uddhav Thackeray
Shinde Group Vs Sanjay Raut : राऊतांची 'ती' टीका झोंबली, शिंदे गटाकडून जशास तसा पलटवार; "त्यांच्या तोंडाला 'एचआयव्ही'..."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com