Shinde Group Vs Sanjay Raut : राऊतांची 'ती' टीका झोंबली, शिंदे गटाकडून जशास तसा पलटवार; "त्यांच्या तोंडाला 'एचआयव्ही'..."

Jalgaon Shivsena Political News : '' राऊतांना आम्हाला टकले म्हणण्याचा अधिकार कोणी दिला..?''
Kishor Patil, Uddhav Thackeray, Sanjay Raut
Kishor Patil, Uddhav Thackeray, Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon : उद्धव ठाकरे यांची रविवारी जळगावात वचनपूर्ती सभा नुकतीच पार पडली. या सभेत ठाकरे गटाची धडाडती तोफ खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांचा खरपूस समाचार घेतला. त्यांनी ठाकरेंच्या सभेने 'त्या' चार टकल्यांना धडकी भरली असेल.आता ते घराबाहेरदेखील पडणार नाहीत, असा हल्लाबोल केला होता. राऊतांच्या निशाण्यावर शिंदे गटात गेलेले जळगाव जिल्ह्यातील चार आमदार असल्याची चर्चा रंगली होती.

खासदार संजय राऊतांची टकले ही टीका शिंदे गटाला चांगलीच जिव्हारी लागली आहे. आता शिंदे गटाकडून राऊतांच्या टीकेला सणसणीत पलटवार करण्यात आला आहे. या वेळी राऊतांना आम्हाला टकले म्हणण्याचा अधिकार कोणी दिला, मला तर वाटते त्यांच्या तोंडाला एचआयव्ही झाला असावा ,असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील (Kishor Patil) यांनी केले आहे.

Kishor Patil, Uddhav Thackeray, Sanjay Raut
Nitesh Rane News : "...तर नितेश राणेंची आमदारकी का रद्द करण्यात येऊ नये ?"; ठाकरे गटानं 'पुण्येश्वर'चा मुद्दा तापवला

पाचोरा येथे उद्या (१२) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याची माहिती देतानाच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत त्यांनी संजय राऊतांवर शेलक्या भाषेत टीकेची झोड उठवली. आमदार किशोर पाटील म्हणाले, संजय राऊत यांनी अशी वक्तव्यं करू नयेत, सध्या ते दररोज असे काहीतरी बरळत असतात. त्यांच्या तोंडाला 'एचआयव्ही' झाला आहे, असे आता महाराष्ट्रातील जनतेला वाटू लागले आहे.

आमदार किशोर पाटलांनी मराठा आरक्षणावरदेखील भाष्य केले. ते म्हणाले, मराठ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आरक्षण देऊ शकतील असा आपल्याला विश्वास आहे. उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांना बेकायदा मुख्यमंत्री म्हणतात,असे कुठे बेकायदा मुख्यमंत्री असतात काय? त्यांना राज्यपालांनी शपथ दिली आहे. रीतसर त्यांनी पदग्रहण केले आहे. सर्व कायद्याने केले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांनी अशी काही वक्तव्यं करू नयेत, असेही ते म्हणाले.

संजय राऊत काय म्हणाले होते...?

शिवसेनेचे खासदार राऊत यांनी जळगावातील बंडखोर शिवसेना आमदारांसह भाजपवर सडकून टीका केली. या सभेत राऊतांनी राज्याचे पाणीपुरवठामंत्री आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) त्याचबरोबर पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील, पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील आणि मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील या नेत्यांना अप्रत्यक्ष टोला लगावला होता.

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, आम्ही इथे येऊ नये, उद्धव ठाकरे यांनी इथे येऊ नये, छत्रपती शिवाजी महाराज आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यांचं अनावरण हे देशभक्त आणि स्वाभिमानी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होऊ नये म्हणून या चार टकल्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. पण आम्ही आलो, उद्धवजी आले, त्यांचं भव्य स्वागत झालं, त्यांनी पाहिलं आणि जिंकलं. हजारोंच्या संख्येने इथे लोक जमले आहेत. आजच्या या सभेने त्या चार टकल्यांना धडकी भरली असेल, असा टोलाही राऊतांनी लगावला.

Kishor Patil, Uddhav Thackeray, Sanjay Raut
Bhandara News : आमदार भोंडेकरांची वाढली जबाबदारी ; जखमी गोविंदांना द्यावी लागणार शासकीय नोकरी

ते चार टकले म्हणजे शिवसेना आहे का?

अनेकांना आजच्या सभेची चिंता वाटत होती. या सभेला गर्दी होईल की नाही, याची काहींना काळजी वाटत होती. कारण काही लोक सारखं सारखं म्हणायचे की, जळगावची शिवसेना गेली, जळगावातली शिवसेना संपली, अरे चार टकले गेले म्हणून शिवसेना संपली का? ते चार टकले म्हणजे शिवसेना आहे का? खरी शिवसेना ही आपल्यासमोर या गर्दीत आहे. ही पाहा संपूर्ण जळगावातली शिवसेना असं आव्हानही विरोधकांना दिले.

(Edited By Deepak Kulkarni)

Kishor Patil, Uddhav Thackeray, Sanjay Raut
Eknath Shinde On Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठीची 'सह्याद्री'वरील सर्वपक्षीय बैठक संपताच मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा; म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com