Eknath Shinde Bag Check : राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची हेलीपॅडवर कसून तपासणी!

Eknath Shinde Bag Check At Nashik : पैसे वाटपाच्या तक्रारी; मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची हेलीपॅडवर झाली तपासणी नाशिक लोकसभा मतदारसंघात पैसे वाटपाच्या तक्रारींमुळे महाविकास आघाडी झाली अलर्ट‍.
Eknath Shinde Bag Check
Eknath Shinde Bag CheckSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोबत आणलेल्या बॅगांबाबत तक्रार केली होती मुख्यमंत्री शिंदे यांच्या चार दिवसांपूर्वी झालेल्या दौऱ्यात विविध बॅगातून 19 कोटी रुपये आणल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. त्यामुळे हा चर्चेचा विषय झाला होता. आज नाशिकमध्ये पोहचल्यानंतर हेलीपॅडवर चक्क मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर आज नाशिकच्या दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिपॅड वर उतरल्यावर त्यांच्यासोबत असलेल्या बॅगांची पोलिसांनी तपासणी केली. या बॅगांमध्ये प्रवासासाठी आवश्यक असलेल्या वस्तू आणि कपडे असल्याचे आढळले. निवडणूक आयोगाच्या विशेष पथकाच्या सूचनेवरून पोलिसांनी ही कारवाई केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याच बॅगांची हेलिपॅड वर चौकशी झाली त्यामुळे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. राजकीय कार्यकर्त्यांमध्ये तो चर्चेचा विषय ठरला. लोकसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात असल्याने अनेक गैरप्रकार होण्याची शक्यता आहे. काही कार्यकर्त्यांनी पैशाचे वाटप होणार असल्याचे तक्रारी देखील केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि पोलिसांची यंत्रणादेखील अलर्ट झाली आहे.

Eknath Shinde Bag Check
Pune BJP News : 'सबका हिसाब होगा'; भाजप पदाधिकाऱ्यांच्या कामाचं होणार पोस्टमार्टेम ...
Eknath Shinde Bag Check
NCP Party Symbol Case : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाची सुनावणी आता जुलै महिन्यात !

मतदानाच्या दोन दिवस आधी नाशिक मध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होऊ शकतात. सत्ताधारी पक्षाकडून हे प्रकार केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) जागरूक आहे. यासंदर्भात आज महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक देखील झाली. यामध्ये महायुतीच्या उमेदवाराकडून होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी काम केले जाणार आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com