Mahayuti News: आगामी महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यात अन्य पक्षाच्या नगरसेवकांना प्रवेश देण्यावर त्यांचा भर असेल. मात्र नगरसेवकांच्या प्रवेशासाठीची कार्यपद्धती आता चर्चेचा विषय ठरली आहे.
नाशिक शहरात नुकतेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केला. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या दोन नगरसेवकांची सध्या त्यांची चर्चा सुरू आहे. शहरात एकंदर २० ते २२ नगरसेवकांना शिंदे पक्षात घेऊन महापालिका निवडणुकीला सामोरे जाण्याचे त्यांचे धोरण आहे.
शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने हे प्रवेश देताना माझे नगरसेवकांना विकास निधी देण्याचे आश्वासन दिले जात आहे. त्यामुळे अनेक शिवसेना उद्धव ठाकरे पक्षासह विविध पक्षाचे नगरसेवक या पक्षात जाण्यास उत्सुक असल्याचे बोलले जाते. यावरच आता महायुतीचे सहकारी पक्ष अस्वस्थ झाले आहेत.
यासंदर्भात भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन काल नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे पक्षाकडून माजी नगरसेवकांच्या प्रवेशासाठी सुरू असलेल्या कार्यपद्धतीबाबत तक्रार करण्यात आल्याचे समजते. याबाबतची सविस्तर माहिती पदाधिकाऱ्यांनी मंत्री गिरीश महाजन यांना दिली आहे.
काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे काही नगरसेवक भारतीय जनता पक्षात जाण्यास उत्सुक होते. मात्र या नगरसेवकांची शिवसेना शिंदे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी संपर्क केला आहे. प्रभाग निहाय प्रभावी उमेदवार तयार करण्यावर या पक्षाचा भर आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार पक्षाचे पदाधिकारी अस्वस्थ झाले आहे.
माझे नगरसेवकांना देण्यात येणाऱ्या निधी नगर विकास विभागाकडून देण्याचे धोरण आहे. मात्र अर्थ विभाग उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे. त्या दृष्टीने हा निधी उपलब्ध होऊ नये यासाठी प्रयत्न होत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे सत्तेच्या माध्यमातून होणारा हा विस्तार रोखण्यासाठी महायुतीचे घटक पक्षच सरसावले आहेत असे चित्र आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. या संदर्भात बुधवारी मुंबईत बैठक होणार आहे. यावेळी नाशिक महापालिका निवडणुकी संदर्भात चर्चा होईल त्यात शिवसेना शिंदे पक्षाकडून अन्य पक्षातील माजी नगरसेवकांना दिले जाणारे प्रवेश यावर देखील चर्चा होईल, असे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
एकंदरच शिवसेना शिंदे पक्षाचा विस्तार आणि होणारे माजी नगरसेवकांचे प्रवेश सहकारी पक्षांच्या अस्वस्थतेचे कारण बनले आहे. त्यामुळे महायुतीत विसंवाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुका महायुतीने एकत्र लढाव्यात, असे सध्याचे धोरण आहे. शिवसेना शिंदे पक्षाच्या आक्रमक विस्तारामुळे त्यात अडथळा येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे शिवसेना शिंदे पक्षाचे हे राजकारण चर्चेचा विषय बनले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.