Hiraman Khoskar : मंत्री नाराज, मात्र आमदारावर शुभेच्छांचा वर्षाव, काय आहे प्रकरण?

Hiraman Khoskar Latest Updates : राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर यांच्या भूमिकेने आदिवासी विभागाचे प्रशासन अस्वस्थ
Dr Ashik Ueeke | MLA Hiraman Khoskar
Dr Ashik Ueeke | MLA Hiraman KhoskarSarkarnama
Published on
Updated on

NCP News: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार हिरामण खोसकर विविध कारणांनी चर्चेत असतात आताही त्यांनी हाती घेतलेल्या एका प्रश्नामुळे आदिवासी विकास मंत्री नाराज आहेत, मात्र खोसकर पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहे.

आदिवासी विकास विभागाचे वसतिगृह आणि तेथील सुविधा याविषयी विद्यार्थ्यांच्या नेहमीच तक्रारी असतात असाच एक गंभीर प्रकार मुंढेगाव (इगतपुरी) येथील आश्रम शाळेत घडला. त्यावर आमदार हिरामण खोसकर यांनी थेट आश्रम शाळेला भेट देऊन तक्रार केली.

Dr Ashik Ueeke | MLA Hiraman Khoskar
Dr Ashok Ueeke: डॉ गावित गेले, डॉ अशोक उईके आले अन् सगळ्यांना कामाला लावून गेले!

यामुळे प्रशासनातील अधिकारी मात्र चांगलेच अस्वस्थ झाले. सेंट्रल किचन बाबत गेली अनेक दिवस तक्रारी होत्या. मात्र त्या व्यवस्थित काहीही सुधारणा होत नव्हती. आदिवासी विद्यार्थ्यांना अत्यंत निकृष्ट जेवण मिळत असल्याने अनेक पालकांनी विद्यार्थी शाळेतून काढून घेतले होते, असा दावा आमदार खोसकर यांनी केला.

Dr Ashik Ueeke | MLA Hiraman Khoskar
Rane Vs Thackeray : उद्धव ठाकरेंचे हात आता छोटे झालेत; नारायण राणे यांचा 'मार्मिक' टोला

आमदार खोसकर हे सत्ताधारी पक्षाचे आहेत. त्यांनी थेट आदिवासी विकास विभागाच्या कारभारावरच बोट ठेवले आहे. त्यामुळे प्रशासन अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे. मात्र या प्रश्नावरून आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके हे चांगलेच अस्वस्थ झालेले दिसले.

मुंढेगाव प्रकरणात चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे डॉ उईके यांनी सांगितले. मात्र त्याचवेळी त्यांनी आमदार खोसकर यांच्या आंदोलनाबाबत नाराजी व्यक्त केली. सत्ताधारी पक्षाचे असूनही ते आंदोलन करतात. हे योग्य नाही. त्यांनी प्रशासनाकडे आणि अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी प्रश्न सुटले नाही तर, माझ्याकडे तक्रार करावी मात्र आंदोलन करू नये या शब्दात त्यांनी आमदार खोसकर यांचे कान टोचले आहे.

आमदार खोसकर यांनी मात्र मंत्र्यांच्या वक्तव्याला फारसे महत्त्व दिलेले नाही. या प्रश्नावर आवाज उठविल्याने राज्यभरातील अनेक जिल्ह्यातून मला अभिनंदन करणारे फोन आले. दीड ते दोन हजार पालकांनी माझे आभार मानले. त्यामुळे या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात येते, असे त्यांनी सांगितले.

ही व्यवस्था सुरळीत करण्यासाठी तहसीलदार, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी, सुरक्षा विभाग, गटविकास अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांची एक समिती असावी. या समितीने दरमहा सेंट्रल किचनची तपासणी करावी, अशी आपली सूचना आहे. याबाबत आजच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एकंदरच आदिवासी विभागाच्या कारभारावर आमदार खोसकर यांनी बोट ठेवले आहे. त्यांचा हा आरोप या विभागाच्या चांगल्या जिव्हारी लागलेला दिसतो. आता आदिवासी विकास मंत्री यांनी केलेल्या विधानाला खोसकर काय प्रतिसाद देतात आणि काय प्रतिक्रिया व्यक्त करतात याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com