Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी त्र्यंबकेश्वरमधील 'ते' शुल्क रद्द केलं ; म्हणाले, 'दात कोरुन पोट भरत नाही'

Trimbakeshwar Vehicle Entry Fee Cancelled : त्र्यंबकेश्वर येथे भाविकांकडून घेतल्या जाणाऱ्या वाहन प्रवेश शुल्कावरुन तेथील कर्मचाऱ्यांकडून अलिकडेच नाशिकमधील पत्रकारांना मारहाण झाली होती.
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde : त्र्यंबकेश्वरला प्रवेश करण्यासाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कावरून तेथील कर्मचाऱ्यांनी नाशिकमधील काही पत्रकारांना मारहाण केली होती. संपूर्ण राज्यभरात या प्रकरणाची चर्चा झाली. या घटनेची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द केला असून याशिवाय आकारले जाणारे प्रवेश शुल्कही रद्द केल्याचे स्पष्ट केले आहे.

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे श्री त्र्यबकेश्वरांच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात. त्यांच्याकडून गेल्या काही वर्षांपासून वाहन प्रवेश शुल्क आकारले जात होते. त्यासाठी निविदेद्वारे ठेकेदार नेमण्यात आला होता. मात्र, या कर्मचाऱ्यांकडून भाविकांशी अरेरावी व गुंडगिरीच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत होत्या. या घटनांमुळे भाविकांमध्ये नाराजी निर्माण होत होती तसेच त्र्यंबकेश्वर नाशिकची प्रतिमाही मलिन होत होती. त्यात त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांना झालेल्या मारहाणीनंतर भाविकांना भितीही वाटू लागली होती. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी गंभीर दखल घेत वाहन प्रवेशशुल्क कायमचे रद्द करण्याचे आदेश दिले.

या प्रवेश शुल्कातून एक कोटी आठ लाख रुपयांचा महसूल प्राप्त होत होता. दात कोरून पोट भरत नाही असं शिंदे म्हणाले. त्र्यंबक नगरपालिकेचा जर एवढा महसूल बुडत असेल तर नगरविकास विभागातून तो उपलब्ध करून दिला जाईल असही उपमुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्ट केलं. मुख्याधिकारींनी तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

Eknath Shinde
Nagaradhyaksha Reservation : नाशिक जिल्ह्यात महिलाराज ! नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत जाहीर, पाहा कुणाला संधी?

पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो. पत्रकार हा समाजाचा महत्वाचा घटक असून तो वस्तुस्थिती मांडत असतो. शिवसेना पत्रकारांच्या पाठिशी उभी आहे असही शिंदे म्हणाले. नाशिकमध्ये झालेल्या शिवसेनेच्या बूथप्रमुख कार्यशाळा व पदाधिकारी बैठकीत ते बोलत होते.

त्र्यंबकेश्वर शहरात येणाऱ्या भाविकांकडून घेतली जाणारे वाहन प्रवेश शुल्क रद्द झाल्याने आता यामुळे राज्यासह परराज्यातून येणाऱ्या भाविकांची सोय होणार असून त्यांना दिलासा मिळाला आहे. यामुळे शुल्क वसुलीमुळे होणारी गुंडगिरी आणि हाणामारीचे प्रकार कायमचे थांबणार आहेत. या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com