शिवसेना अभेद्य राहिल्याने नाशिकमध्ये शिंदे गट अस्वस्थ?

मुख्यमंत्री शिंदे यांच्या समवेत रविवारी होणाऱ्या बैठकीत अस्वस्थता व्यक्त होण्याची शक्यता
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeSarkarnama

नाशिक : उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackerey) शिवसेनेला (Shivsena) महाराष्ट्रात (Maharashtra) शह देण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटाने (Eknath Shinde group) जोरदार तयारी केली आहे. मात्र त्यांना प्रतिसाद मिळत नाही. सध्या तरी नाशिकमध्ये या गटाकडे आमदार, खासदार व मोजके नेते सोडल्यास कार्यकर्त्यांची वाणवा असल्याने स्थानिक नेते अस्वस्थ असल्याचे चित्र आहे. (Eknath shinde group trying to break Shivsena in Nashik city politics)

CM Eknath Shinde
सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे का केले नाही!

या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये ठाकरे सेनेच्या दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांना शिंदे गटात खेचण्याची रणनीती आखली जात आहे. ठाकरे सेनेतील दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांमधील अस्वस्थता टिपून भगदाड पाडण्याचे नियोजन आहे.

CM Eknath Shinde
अंधेरी रातोमे एक मसीहा निकलता है...वाळू माफीया धास्तावले!

जून महिन्यात राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये फूट पडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भाजपच्या मदतीने सरकार स्थापन झाले. तब्बल ४० आमदार फुटल्याने शिवसेनेसाठी मोठा झटका बसला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच आमदार फुटताना संघटना व संघटनेच्या चिन्हावरदेखील दावा केला. सध्या हा वाद न्यायप्रविष्ट आहे. परंतु, एकीकडे न्यायालयीन लढाई लढत असताना दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला भगदाड पाडण्याचे नियोजन शिंदे गटाकडून केले जात आहे.

शिवसेनेच्या दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता टिपली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या दुसऱ्या फळीमध्ये अस्वस्थता आहे. संघटनेत पहिल्या क्रमांकावर येताना पहिल्या फळीतील पदाधिकाऱ्यांची अडचण आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून काम करूनही चांगली संधी मिळत नसल्याची भावना तयार झाली. अस्वस्थतेची ही भावना फिरून नव्याने स्थापन झालेल्या शिंदे गटाने दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांना गटात खेचण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने ही तयारी असून, शिंदे गटाचे भाजपसोबत युती झाल्यास वेळेवर उमेदवारांची शोधाशोध करण्याची आवश्यकता भासणार नाही असा कयास यामागे आहे.

मुख्यमंत्री निवासस्थानी बैठक

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने लोकसभा निवडणुकीची तयारी करताना महापालिका निवडणुकीसाठीदेखील तयार राहण्याच्या सूचना शिवसैनिकांना केल्या आहेत. शिवसेनेच्या या भूमिकेला जशास तसे उत्तर देण्यासाठी व्यूहरचना आखली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या रविवारी (ता.६) मुख्यमंत्र्यांच्या मुंबई येथील वर्षा निवासस्थानी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. बैठकीच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे प्रवेशदेखील केले जाणार असल्याचे समजते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com