Dr. Sudhir Tambe; पदविधर निवडणुकीत शिंदे गटाला तारणारा राज ठाकरे कोण?

नाशिक विभागीय पदविधर निवडणुकीसाठी शिंदे गटाची कोंडी होण्याची लक्षणे.
Eknath Shinde & Sudhir Tambe
Eknath Shinde & Sudhir TambeSarkarnama

नाशिक : सतत प्रवेशाच्या बातम्या घडवून देखील शिवसेनेचा (Shivsena) एकनाथ शिंदे (Eknath Shinde Group) गट राजकीयदृष्ट्या कितपत आव्हान देण्याच्या स्थितीत आहे, याची पहिली परिक्षा काल जाहीर झालेल्या पदविधर मतदारसंघाच्या निवडणुकीत होणार आहे. विशेषतः नाशिक (Nashik) मतदारसंघात शिंदे गट काँग्रेसचे (Congress) विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांना आव्हान देण्याच्या स्थितीत नाही. त्यामुळे त्यांना भाजपसमवेत (BJP) जावे लागेल. त्यात त्यांचे राजकीय वस्त्रहरण होण्याचीच चिन्हे आहेत. (Will Eknath Shinde group go with BJP for Nashik Graduate constituncy election)

Eknath Shinde & Sudhir Tambe
Nashik News: डॉ. प्राची पवार यांच्यावरील प्राणघातक हल्ल्यामागे होता हत्येचा कट!

नाशिक पदविधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. आज यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या निवडणुकीत गेल्या दोन निवडणुकांत काँग्रेसचे डॉ. सुधीर तांबे यांनी विरोधकांचे आव्हान एकहाती परतवून लावले आहे. यंदा देखील भाजपने खुप आधी तयारी सुरु करूनही त्यांना अद्याप उमेदवार जाहीर करता आलेला नाही. त्यामुळे सत्ताधारी गटाकडे सगळ्यांचे लक्ष आहे. त्यामुळे अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी मध्यस्थी करून भाजप व शिंदे गटाची पत सावरली होती. या निवडणुकीत राज ठाकरे यांची भूमिका कोण करेल? याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Eknath Shinde & Sudhir Tambe
Niphad Politics: शिवसेनेच्या आरोपांविरोधात शिंदे गटाने उपसले उपोषणाचे अस्त्र!

यंदाची निवडणूक महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या दोन्ही काँग्रेससह शिवसेना अशी राजकीय स्थितीत होत आहे. त्याला महत्त्वाचा कोण म्हणजे शिवसेनेच्या चाळीस आमदारांना फोडून एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडले. स्वतः मुख्यमंत्री झाले.

गेले काही दिवस शिंदे गट सतत जबरदस्तीने शिवसेनेची कार्यालये ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणे, सत्तेचा उपयोग करून प्रशासनाचा सोयीने आपल्या लाभात उपयोग करणे. शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना फूस लावून फोडणे, दबावतंत्र व त्याचा सतत गाजावाजा करीत आहे. एकप्रकारे शिवसेनेला आव्हान दिल्याचे चित्र त्यांनी सतत निर्माण केले. मात्र या सर्व राजकीय स्थितीची परिक्षा येत्या पदविधर मतदारसंघाच्या निवडणुकीत दिसेल. या निवडणुकीत त्यांनी उमेदवार दिला तर त्याला चांगले मतदान होईल का?. मतदान झाले नाही तर या गटाची मानहानी होऊ शकते.

शिंदे गटाची सध्याची स्थिती नाशिक, नंदूरबार, धुळे, नगर आणि जळगाव या पाचही जिल्ह्यात शिवसेनेचे आमदार फोडून स्थापन केलेला गट आहे. मात्र त्यांचा थेट जनमानसात व विशेषतः पदविधर मतदारांपुढे कितपत टिकाव लागेल, हे सांगता येत नाही. यादृष्टीने सतत पक्षप्रवेशाच्या बातम्यांत व्यस्त असलेल्या शिंदे गटाकडून पदविधर निवडणुकीत काय भूमिका घ्याची याबाबत नेमके चित्र स्पष्ट झालेले नाही.

पदविधर निवडणुकीत पारंपारीक लढत महाविकास आघाडीचे डॉ. सुधीर तांबे यांच्या विरोधात भारतीय जनता पक्ष अशी असेल. त्यात शिक्षक पुरोगामी आघाडी (टीडीएफ) संघटनेचा पाठींबा डॉ. तांबे यांनी जाहीर झालेला आहे. अशा राजकीय स्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट राजकीय कोंडीत सापडण्याची शक्यता आहे. ते भाजप बरोबर गेले तरी त्यांची अडचण, स्वतंत्र उमेदवार दिल्यास दुप्पट अडचण. यामध्ये शिंदे गट काय करतो याकडे सगळ्यांचे लक्ष असेल. या राजकीय नामुष्कीतून सुटका करण्यासाठी यंदा राज ठाकरे यांची भूमिका कोण करेल?. त्याचा उपयोग होईल का?.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com