Village Panchayat election news: बिनविरोध सरपंचांच्या सत्कारात शिंदे गटाने मारली बाजी!

शिंदे गटाच्या आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते बिनविरोध सरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
MLA Manjula Gavit honoured Sarpanch.
MLA Manjula Gavit honoured Sarpanch.Sarkarnama
Published on
Updated on

पिंपळनेर : साक्री (Dhule) विधानसभा मतदारसंघातील मौजे होळ्याचापाडा व महुबंद या दोन्ही ग्रामपंचायतींची (Village Panchayat election) निवडणूक बिनविरोध झाली असून, होळ्याचापाडा येथे लोकनियुक्त सरपंच म्हणून पंडित चौरे, तर महुबंधच्या लोकनियुक्त सरपंचपदी गोकुळ गवळे यांची निवड झाली. नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार एकनाथ शिंदे गटाच्या (Eknath Shinde) आमदार मंजुळा गावित (Manjula Gavit) यांच्या हस्ते करण्यात आला. (Both Village Panchayat election unopposed in Sakri Taluka)

MLA Manjula Gavit honoured Sarpanch.
Dada Bhuse News: पालकमंत्र्यांच्या प्रस्तावाला महापालिकेने दाखवला ठेंगा

साक्री तालुक्यातील दोन ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रीया सुरु होती. त्यात स्थानिक पातळीवर झालेल्या राजकीय समन्वयाने स्थानिक कार्यकर्त्यांनी सामोपचाराने निवडणूक बिनविरोध केली. त्यात सर्वच पक्षांचे सहकार्य घेण्यात आले. मात्र या निकालानंतर शिवसेना, काँग्रेस आणि भाजप तिन्ही पक्षांच्या आधी मुख्यमंत्री शिंदे गटाने नवनिर्वाचीत सदस्यांना मधाचे बोट लावत सत्कार केला.

MLA Manjula Gavit honoured Sarpanch.
Suhas Kande News: तुमच्यासाठी जेलमध्ये जायला देखील तयार आहे!

होळ्याचापाडा येथे लोकनियुक्त सरपंच पंडित चौरे, तर सदस्य म्हणून राहुल महाले, चुनीलाल ठाकरे, निर्मलबाई ठाकरे, अशोक साबळे, तर महुबंद येथे पंढरीनाथ पवार, बापू चौधरी, हिरामण गांगुर्डे, दीपाली शिंदे, मीनाबाई शिंदे, यमुनाबाई अहिरे, वंदनाबाई शिंदे यांची निवड झाली. या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा आमदार मंजुळाताई गावित, इंजि. सागर गावित यांनी त्यांच्या गावी जाऊन सत्कार केला.

या वेळी नवनिर्वाचित सदस्य व सरपंचांनी नवीन ग्रामपंचायत कार्यालय बांधून मिळावे, पथदीपांची सोय करावी, गावाकडे येणारे रस्ते तसेच पाइप मोऱ्यांची कामे करून मिळावीत, कृषिपंपास दिवसा वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आमदार गावित यांच्याकडे केली. मागण्यांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन आमदार गावित यांनी दिले.

या वेळी आमदार डॉ. तुळशीराम गावित यांच्यातर्फे इंजि. सागर गावित उपस्थित होते. पंचायत समिती सदस्य राजू पवार, सरपंच विक्रम भोये, गोटू चौरे, गोवर्धन मानकानी, सोमा गवळी, शिवराम बहिरम, बापू पवार, तानाजी बहिरम, अनिल बागूल, श्रावण चौरे, गुलाब चौरे, अहिशचंद्र ठाकरे, सोनू बहिरम, काशीनाथ बहिरम, अरुण ठाकरे, राजाराम बहिरम, रामराव ठाकरे, धनलाल ठाकरे, एकनाथ बहिरम, रमेश देशमुख, वसंत महाले, बापू भोये, रघुनाथ चौरे, खंडू साबळे, बनिराम महाले, भास्कर बहिरम, श्यामराव बहिरम, युवराज बहिरम, एकनाथ ठाकरे, रवींद्र गांगुर्डे, मगन चौरे, अरविंद चौरे आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com