Eknath Shinde politics: आमदार किशोर पाटील यांचा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र बुमरँग होणार?

Eknath Shinde politics, BJP's obstacle now in MLA Kishore Patil's way-आमदार किशोर पाटील यांची विधानसभेची वाटचाल दिवसेंदिवस बिकट होत आहे.
Kishor Patil & Amol Shinde
Kishor Patil & Amol ShindeSarkarnama
Published on
Updated on

Kishor Patil News: पाचोरा विधानसभा मतदारसंघात राजकीय गुंता वाढला आहे. महायुतीचे घटक असलेल्या शिंदे गटाला त्याचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आमदार किशोर पाटील यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र केल्याने बुमरँग झाल्याची चर्चा रंगली आहे.

विधानसभा निवडणूक जवळ येऊ लागली आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांच्या आकांक्षांना घुमारे फुटू लागले आहेत. यात महायुतीच्या घटक पक्ष्यांच्या नेत्यांनी महायुतीच्या मार्गात काटे पेरण्याचे काम सुरू केले आहे.

पाचोरा विधानसभा मतदारसंघात आमदार किशोर पाटील यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातील राजकीय चित्र दिवसेंदिवस क्लिष्ट होत चालले आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी निवडणूक राज्यभर होण्याची चिन्हे आहेत.

पाचोरा विधानसभा मतदारसंघात शिवसेना मुख्यमंत्री शिंदे गटाचे आमदार पाटील यांना महाविकास आघाडीच्या आधी उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी अर्थात घरातूनच आव्हान मिळाले होते.आता त्यात भाजपनेही उडी घेतली आहे.

Kishor Patil & Amol Shinde
Gulabrao Patil: गुलाबराव यांनी कार्यकर्त्यांकडे मागितले एवढे दिवस...

भारतीय जनता पक्षाचे विधानसभा मतदार संघ प्रमुख अमोल शिंदे यांच्याशी आमदार पाटील उमेदवारीसाठी लढावे लागणार आहे. त्यामुळे पाचोरा विधानसभा मतदारसंघ महायुतीतील कोणत्या पक्षाला यावरून मोठे रणकंदन माजणार असे संकेत आहेत. त्यात २०१९ च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.

गेल्या निवडणुकीत अमोल शिंदे यांनी भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती. त्यात त्यांनी शिवसेनेचे किशोर पाटील यांना चांगलेच आव्हान दिले. अगदी शेवटच्या फेरीत किशोर पाटील दोन हजार अशा निसटत्या मताधिक्याने जिंकले होते. त्यामुळे आमदार पाटील यांना पुन्हा बंडखोरीच्या इशाऱ्यामुळे चिंता आहे.

या राजकीय वादामुळे आमदार पाटील यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. आमदार पाटील यांना कुटुंबातील भगिनी वैशाली सूर्यवंशी यांनी आधीच त्यांना आव्हान दिले आहे. आमदार पाटील यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळल्यावर त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची सार्थ केली होती.

Kishor Patil & Amol Shinde
Congress politics: काँग्रेसने भाजपच्या अनुराग ठाकूर यांना ठणकावले, सगळेच काढले...

आमदार पाटील यांची बंडखोरी आता त्यांच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा ठरली आहे. शिवसेना ठाकरे गटाने श्रीमती सूर्यवंशी यांना महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर केली आहे. दुसरीकडे महायुतीतील उमेदवारी आणि मतदार संघाचे वाटप दोन्हींचे चित्र बिकट झाले आहे.

विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने या जागेवर दावा केला आहे. भाजपचे शिंदे यांनी अजित पवार गट आणि शिंदे गट या दोघांचा दावा फेटाळला. भाजपची उमेदवारी करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

भाजपाने उमेदवारी न दिल्यास अपक्ष उमेदवारी करणार असल्याचे शिंदे यांनी शुक्रवारी जाहीर केले. दोन दिवसांपूर्वी अजित पवार गटाच्या दिलीप वाघ यांनीही कोणत्याही स्थितीत निवडणूक लढणारच अशी घोषणा केली होती. त्यामुळे महायुतीला रोज नवे धक्के बसत आहेत.

Kishor Patil & Amol Shinde
Ajit Pawar Politics: आमचं ठरलंय, भुजबळ आज माझ्याबरोबर नाहीत, कारण...

या सर्व घडामोडी कार्यकर्ते आणि पदाधिकारी दोघांचाही गोंधळ दिवसेंदिवस वाढत आहे. निवडणूक जवळ आल्याने पाचोरा विधानसभा मतदारसंघात महायुतीतील तीन्ही पक्षांनी मतदारसंघावर दावा केला आहे. तिन्ही पक्षांचे उमेदवार देखील निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

यामध्ये विद्यमान आमदार किशोर पाटील यांच्या विधानसभा पोहोचण्याच्या मार्गात रोज नव्हे अडथळे येत आहेत. महायुतीच्या नेत्यांना यातून मार्ग काढण्यात यश येईल का याचीच उत्सुकता आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com