Eknath Shinde politics: मालेगावच्या 'लाडक्या बहिणीं' शिंदेंना की आघाडीला देणार कौल?

Eknath Shinde politics, Malegaon's 'Dear Sisters' says, Mahavir Aghadi is only real brother for voting-अनुदानासाठी बँकांपुढे गर्दी करणाऱ्या मालेगाव मतदारसंघातील लाडक्या बहिणी मतदानावेळी मात्र मुख्यमंत्री शिंदेंना विसरणार?
CM Eknath Shinde & Malegaon Womens
CM Eknath Shinde & Malegaon WomensSarkarnama
Published on
Updated on

BJP Vs Congress News: मालेगाव शहर अनेक अर्थाने एक वेगळे शहर आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी देखील येथे एक वेगळे चित्र पाहायला मिळणार आहे. हे चित्र महायुतीच्या आनंदात मिठाचा खडा टाकणारे असेल असा दावा केला जातो.

राज्य शासनाने मोठ्या अपेक्षेने, राजकीय डावपेच म्हणून लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेच्या प्रचारावर खर्च देखील करीत आहेत. राज्यभर मेळावे घेतले जात आहेत.

या मेळाव्यातून महिला महायुतीच्या सरकारला पुन्हा सत्तेवर आणतील, असा विश्वास या सरकारला वाटतो. मालेगाव शहरात मात्र स्थिती अतिशय वेगळी आहे. महायुतीच्या आणि राज्यातील अन्य मतदार संघातील मतदारांच्या डोळ्यात अंजन घालणारे हे चित्र आहे.

गेल्या आठवड्या पर्यंत लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून देण्यासाठी या शहरात चढाओढ लागल्याचे दिसून आले. येथील महिलांसाठी दीड हजार रुपये महिना अनुदान हे लक्षणीय मानले जाते. त्यामुळे अनुदान जाहीर झाल्यानंतर बँकांपुढे अगदी रात्रभर देखील महिलांनी रांगा लावल्या होत्या.

CM Eknath Shinde & Malegaon Womens
Nashik politics: पश्चिम मतदारसंघात भाजपच्या इच्छुकांची रांग, 'हे' आहे कारण!

या रांगांमुळे वाहतूक कोंडी देखील झाली होती. या कोंडीमुळे आणि गर्दीमुळे महायुतीला काही मोठ्या लाभ होईल, अशी अपेक्षा मात्र कोणीही करू नये. कारण गेली अनेक वर्ष परंपरेने या महिला योजना काय आणि फायदा काय यापेक्षा आपल्या जवळचा कोण याचा विचार करून मतदान करीत आलेल्या आहेत.

अल्पसंख्यांक समाजाचे त्यात प्राबल्य आहे. त्यामुळे सध्याचे चित्र पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत विरोधकांना सावत्र भाऊ म्हटले आहे. मात्र मालेगावच्या महिलांच्या दृष्टीने लाडकी बहीण योजनेच्या अनुदानासाठी मुख्यमंत्री शिंदे हे लाडके भाऊ आहेत. मतदानासाठी मात्र महाविकास आघाडीचा उमेदवारच त्यांच्यासाठी सख्खा भाऊ असेल, असे सध्याचे चित्र आहे.

मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात एमआयएम पक्षाचे मौलाना मुक्ती इस्माईल हे विद्यमान आमदार आहेत. त्यांनी पुन्हा एकदा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाने मोर्चे बांधणी केली आहे.

CM Eknath Shinde & Malegaon Womens
Ahmednagar Politics : शरद पवारांना विवेक कोल्हे भेटताच, भाजपच्या पोटात का उठला गोळा?

काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष एजाज बेग हे संभाव्य उमेदवार आहेत. माजी आमदार असिफ शेख हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते होते. मात्र मालेगावमध्ये मतदारसंघातील राजकीय स्थिती पाहता, जागा वाटपाचा अंदाज घेऊन त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

माजी आमदार शेख आता अपक्ष उमेदवारी करण्याच्या तयारीत आहेत. या संदर्भात त्यांनी प्रचार आणि गाठीभेटी देखील सुरू केल्या आहेत. विधानसभा निवडणूक केव्हाही जाहीर होईल, अशी स्थिती आहे. यामध्ये महायुतीच्या सरकारने विविध योजना जाहीर करण्याचा धडाका लावला आहे. अनेक मतदार आणि नागरिक यांना रोखीत लाभ देण्याच्या घोषणा होत आहेत.

ही स्थिती असली तरी निवडणुकीत काय निकाल लागेल, याचा चांगलाच धसका महायुतीने घेतला आहे. निदान मालेगाव शहर मतदारसंघात तरी लाडक्या बहिणींची सध्याची राजकीय मानसिकता विचारात घेता योजना महायुती सरकारच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मात्र मतदानासाठी या लाडक्या बहिणींना महाविकास आघाडीच सख्खा भाऊ असे चित्र आहे.

--------

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com