Shivsena Eknath Shinde: उत्साह वाढलेली शिंदेंची शिवसेना म्हणते, ठाकरे समर्थकांना ‘नो एन्ट्री’

Eknath Shinde; Shinde followers oppose to allow Uddhav Thackrey follows in Shivsena-शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुरू केली महापालिका निवडणुकीची तयारी
Bunty Tidame
Bunty TidameSarkarnama
Published on
Updated on

Shivsena Politics: विधानसभा निवडणुकीत नाशिक शहरात शिवसेना शिंदे पक्षाकडे अवघे दोन आमदार असल्याने फारशी संधी नव्हती. मात्र जिल्ह्यातील दोन्ही जागा त्यांनी राखल्या. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवारी शहरात झाली. या बैठकीत प्रामुख्याने विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाचे कौतुक करण्यात आले. कार्यकर्त्यांनी यश मिळवल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. मात्र यावेळी एक गट अनुपस्थित असल्याने या बैठकीची वेगळीच चर्चा झाली.

Bunty Tidame
Congress politics: ‘या’ मतदारसंघात राजीनामा दिलेले ६५ पदाधिकारीच करणार काँग्रेसची पुर्नबांधणी...

विधानसभा निवडणूक निकाल याने महायुतीच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा घटक असलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांत निरुत्साह आहे. यातील काही कार्यकर्ते वेगळा मार्ग शोधण्याच्या तयारीत आहे.

Bunty Tidame
Narhari Zirwal Politics : मंत्री झिरवाळ यांचे भुजबळांबाबत मोठे विधान; म्हणाले, ते सरकारमध्ये असणे अनेकांना..!

या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी आगामी महापालिकेत निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्राधान्य द्यावे. उमेदवारी देताना पक्षाशी एकनिष्ठ आहे की नाही, याचा विचार झाला पाहिजे. उद्धव ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांना महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिंदे गटाने प्रवेश देऊ नये अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

नाशिक शहरात शिवसेना शिंदे पक्षाचे दोन उपनेते आहेत. यातील विजय करंजकर हे या बैठकीला उपस्थित होते. मात्र अजय बोरस्ते हे या बैठकीला उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांचे अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. महानगर प्रमुख बंटी तिदमे यांनी मात्र पक्षात एकोपा आणि उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत आपल्या पक्षाला चांगले यश मिळेल असा दावा केला.

आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गट महायुती म्हणून एकत्रितपणे निवडणुका लढवेल की नाही हे अनिश्चित आहे. त्यामुळे पक्षाने शहरात सदस्य नोंदणी अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या प्रभागात जास्तीत जास्त सदस्यांची नोंदणी करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले.

यावेळी माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे, आर. डी. धोंगडे, शामकुमार साबळे, योगेश म्हस्के, मंदाकिनी जाधव, मंदा दातीर, जयश्री खर्जुल, चंद्रकांत खोडे, हर्षदा गायकर यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. या पदाधिकाऱ्यांनी आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाची कामगिरी चांगलीच राहील, याविषयी आत्मविश्वास व्यक्त केला. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना आता प्रवेश देऊ नये, अशी ठाम भूमिका घेण्याची मागणी केली.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com