Shivsena Eknath Shinde News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे पक्षाने दिंडोरीत वेगळेच नियोजन केले आहे. या पक्षाने पारंपरिक विरोधक उद्धव ठाकरे पक्षाची अडचण केली. प्रस्थापित मंत्री नरहरी झिरवड यांचीही कोंडी करण्याचे ठरविले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते श्रीराम शेटे यांचे दिंडोरीच्या सहकारावर वर्चस्व आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे मंत्री नरहरी झिरवाळ हे सध्या दुसरे सत्ता केंद्र बनले आहे. या दोन्ही प्रस्थापितांना एका नव्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे तालुकाप्रमुख किशोर कदम यांनी प्रत्येक गावात आपली यंत्रणा उभी करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक नवे कार्यकर्ते त्यांना सामील झाले आहेत. विशेष म्हणजे आदिवासी तालुका असलेल्या दिंडोरीत २५ हजार नागरिकांनी या पक्षाचे ऑनलाइन सदस्यत्व स्वीकारले आहे. त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे तालुक्यात आजवर राजकीय वर्चस्व असल्याचे बोलले जाते. धक्का देण्याचे काम शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने केले आहे. दिंडोरी नगरपंचायतीत सध्या नगराध्यक्षांसह सात नगरसेवक या पक्षाचे आहेत. म्हणजे सहा पैकी तीन माजी जिल्हा परिषद सदस्य शिवसेना शिंदे पक्षाशी संलग्न असल्याचा दावा तालुकाप्रमुख कदम यांनी केला आहे.
आगामी निवडणुकीत प्रस्थापित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांना धक्का देण्याची आपली तयारी आहे. महायुती कायम राहिल्यास ठीक अन्यथा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची शिवसेना शिंदे पक्षाने तयारी केल्याचा दावा कदम यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे पक्षाने ठाण्याची पारंपारिक 'विशेष' रसद पुरविल्यास दिंडोरीचे राजकीय चित्र बदलण्याची चिन्हे आहेत.
सध्या राज्यात महायुतीचे सरकार असून नरहरी झिरवाळ हे अन्न व औषध प्रशासन मंत्री आहेत. त्यामुळे तालुक्यावर वर्चस्व ठेवण्यासाठी त्यांना राजकीय कष्ट उपसावे लागणार आहेत. तालुक्यावर राजकीय वर्चस्व टिकविण्यात मंत्री झिरवाळ यांना शिवसेनेचा एकनाथ शिंदे पक्ष अडथळा ठरण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका त्यामुळेच शरद पवार यांचा वर्चस्व असलेल्या दिंडोरी तालुक्यात यंदा वेगळ्याच वळणावर जाण्याची चिन्हे आहेत.
माजी आमदार धनराज महाले यांसह सुरेश डोखळे, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक प्रवीण जाधव आणि नुकतेच निधन झालेल्या अण्वंतवाडी गटाचे जिल्हा परिषद सदस्य (कै) सदू गावित आदि नेते शिवसेना शिंदे गटात सक्रिय आहे. प्रत्येक गावात शिवदूत आणि बूथ प्रमुख नियुक्त केल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या दोन्ही पक्षांना शिवसेना शिंदे पक्षाकडून आव्हान उभे राहण्याची चिन्हे आहेत.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.