Gulabrao Patil News; महापालिका आणि जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. त्यामध्ये महायुती स्वबळावर की स्वतंत्र हा खल सुरू आहे.
सध्या प्रत्येक नेता आणि कार्यकर्त्याला सत्तेची सावली आणि लाभ हवा आहे. हे हेरल्याने सध्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष जोरदार इनकमिंग घडवून आणत आहे. त्यासाठी सामान्य कार्यकर्त्यालाही विकासासाठी निधी उपलब्ध केला जात आहे. त्यामुळे या पक्षात इच्छूकाने नेत्यांची गर्दी झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच अपवादात्मक स्थितीत स्वतंत्र निवडणुकांचा विचार होईल असे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने मात्र राज्यातील आपल्या सर्व मंत्र्यांना निवडणूक तयारीच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार जळगाव ग्रामीण मतदार संघात झालेल्या मेळाव्यात निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या.
शिवसेना शिंदे पक्ष सध्याच्या स्थितीत महायुती झाल्यास किती जागा दावा करणार हा सगळ्यांना पडलेला गंभीर प्रश्न आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी हितगुज केले. त्यात सदस्य नोंदणी आणि तळागाळात जाऊन काम करण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना दिले आहेत.
महायुतीचा घटक पक्ष म्हणून शिवसेना शिंदे पक्षाची ही तयारी भारतीय जनता पक्षाला त्रासदायक ठरण्याची चिन्हे आहे. जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषद महापालिका आणि पंचायत समित्यांसह नगरपालिकांवर भारतीय जनता पक्षाचे एक हाती वर्चस्व आहे. यामध्ये त्यांना नवा वाटेकरी निर्माण झाला आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांनी नेते अस्वस्थ होऊ लागले आहेत.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे जळगाव जिल्ह्याच्या संघटनात्मक आणि सत्ता असलेल्या संस्थांवर एखादी वर्चस्व आहे. अशा स्थितीत मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना शिंदे पक्षाच्या विस्ताराला प्राधान्य दिल्यास महायुतीत त्यांचा वाटा वाढ होऊ शकतो.
जळगाव ग्रामीण मतदार संघातील मेळाव्यात तसेच स्पष्ट संकेत या पक्षाने दिले आहेत. त्यामुळे स्वबळाचा नारा दिल्यास भाजपची अडचण होणार. स्वतंत्र निवडणुकांना सामोरे गेल्यास विरोधकांच्या पथ्यावर पडणार, दुहेरी संकटात महायुती जळगाव जिल्ह्यात झुंजते आहे.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.