Eknath Shinde Politics: गिरीश महाजनांच्या वाटेत एकनाथ शिंदेंच्या रायगडचा घाट!

Eknath Shinde; Shivsena Shinde party is main hurdle in Nashik Guardian minister appointment-रायगड जिल्ह्यातील शिवसेना शिंदे पक्षाचे सर्व आमदार पालकमंत्री पदासाठी आक्रमक झाल्याने तिढा
Girish Mahajan, Eknath Shinde & Manikrao Kokate
Girish Mahajan, Eknath Shinde & Manikrao KokateSarkarnama
Published on
Updated on

Shivsena Vs NCP News: राज्यातील नाशिक आणि रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे. ही स्थगिती केव्हा उठणार याबाबत रोज नव्हे कयास लावले जात आहेत. मात्र आता यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचा मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

नाशिकच्या पालकमंत्रीपदी भाजपचे गिरीश महाजन तर रायगडच्या पालकमंत्री पदी अदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र नियुक्ती होतात त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. महायुतीतील घटक पक्षांनी याबाबत आक्रमक रूप धारण केल्याने त्याला स्थगिती देण्यात आली.

Girish Mahajan, Eknath Shinde & Manikrao Kokate
Ajit Pawar : अजित पवारांच्या सुचनेने नाशिकचे मंत्री धर्मसंकटात; सल्ला कृतीत आणतील का?

यासंदर्भात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते भरत गोगावले यांनी आंदोलन केले होते. रायगड मधील चार आमदारांनी काल मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ही भेट होऊ शकली नाही. यावेळी रायगडचे पालकमंत्री म्हणून शिवसेना शिंदे पक्षालाच संधी हवी असा आग्रह आमदारांनी धरला होता.

Girish Mahajan, Eknath Shinde & Manikrao Kokate
Mahakumbh Mela Stampede : महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, ‘यशदा’चा ‘तो’ अहवाल ठरला असता संकटमोटक?

त्यामुळे आता शिवसेना शिंदे पक्ष रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही असल्याचे चित्र आहे. त्यासाठी हा पक्ष आणि त्याचे आमदार अतिशय आक्रमक आहेत. त्यामुळे आदिती तटकरे यांच्या नियुक्तीला हे आव्हान मानले जाते.

रायगडच्या या घडामोडींचा नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीत मोठा अडथळा आहे. हा अडथळा कसा दूर होणार आणि त्यावर राजकीय तोडगा कोण काढणार?. यासाठी सध्या महायुतीतील तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते प्रयत्न करीत आहेत. त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तो मान्य करतील का? हा गंभीर प्रश्न आहे.

रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि शिवसेना शिंदे पक्षाच्या आमदार आणि नेत्यांमध्ये तीव्र संघर्ष निर्माण झाला आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना शिंदे पक्षाच्या विरोधात काम केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे देखील आपल्या आमदारांना दुखावण्याची हिंमत दाखवतील का? याची चर्चा आहे.

रायगडच्या वादातून नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांचे नियुक्ती रखडली आहे. ज्याचे आमदार अधिक त्याचा पालकमंत्री हे धोरण रायगड साठी राबवावे असा आग्रह आहे. त्यामुळे आता या वादाला नवे वळण मिळाल्यास नाशिकचे पालकमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जाते की काय? अशी स्थिती आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com