दिल्लीच्या ऊर्जा मंत्रालयाचे संचालक मिलींद देवरेंनी घेतला म्हसदी गावाच्या विकासाचा ध्यास!

म्हसदी गावचे विविध क्षेत्रात चमकलेले भूमीपुत्र दिवाळ सणाला गावात एकत्र आले.
Energy Director Milind Devre.
Energy Director Milind Devre.Sarkarnama
Published on
Updated on

म्हसदी : गावाच्या विधायक कामासाठी कोणतेही सहकार्य केले जाईल.' गड्या आपुला गाव बरा 'या उक्तीप्रमाणे जन्मभूमीची आठवण कायम राहील.ग्रामपंचायत आणि गावाने केलेला गौरव हा कुटुंबाचा सन्मान आहे. बाहेरगावी नोकरी वा व्यवसायासाठी गेलेली प्रत्येक व्यक्ती गावासाठी तत्पर असेन असा विश्वास येथील भुमिपुत्र तथा नवी दिल्ली येथील ऊर्जा मंत्रालयाचे संचालक मिलींद देवरे (Energy ministry director Minind Devre) यांनी व्यक्त केला.

Energy Director Milind Devre.
देवेंद्र फडणवीस हे तर बॅक बेंचर; मुंडे त्यांना माझ्याकडे घेऊन आले होते!

काल (ता. ६) सायंकाळी दिवाळीत भाऊबिजेच्या निमित्ताने ग्रामपंचायत कार्यालयात विविध क्षेत्रात नियुक्ती तथा यश मिळवलेल्या भुमिपुत्रांचा विशेष गौरव करण्यात आला. निवृत्त विभाग नियंत्रक तथा सरपंच प्रतिनिधी राजेंद्र देवरे अध्यक्षस्थानी होते.

धनराज विस्पुते यांनी गावातील शेकडो युवक बाहेर गावी नोकरी वा व्यवसायासाठी स्थिरावली आहेत. पण गावाला विसरलेली नाहीत. गावासाठी धावून येण्याची आमची परंपरा आहे. सरपंच प्रतिनिधी राजेंद्र देवरे यांनी गाव विकासासाठी अनेक नविन संकल्पना आहेत. नोकरदार वा बाहेरगावी असणा-यांनी आपल्या मनातील संकल्पनेसह चांगल्या कामात सहभागी व्हावे असे आवाहन केले. हसीलदार स्नेहंका शिंदे, सुभाष देवरे, दर्शन देवरे, स्वप्निल देवरे, स्वप्निल चव्हाण, मिलिंद देवरे, मुन्ना देवरे, प्रियंका देवरे, राहूल सोनवणे, महेंद्र देवरे, हरिष सोनवणे आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

Energy Director Milind Devre.
केंद्र महाराष्ट्राचा अवमान करते, म्हणूनच भाजप नेते महाराष्ट्रद्रोही आहेत!

भुमिपुत्रांचा गौरव !

यावेळी झालेल्या मेळाव्यात तहसीलदार स्नेहंका मधुकर भामरे, आरबीआय बॅंकेच्या अधिकारी प्रिंयका देवरे, नवी मुंबईचे उप कार्यकारी अभियंता चेतन देवरे यांचे वडील वसंतराव देवरे, सहाय्यक अभियंता मानसी देवरे यांचे वडील सुभाष देवरे, शास्त्रज्ञ म्हणून निवड झालेले दिनेश खैरनार यांचे पालक आदींचा सरपंच, प्रतिनिधीसह गौरव करण्यात आला. गावात सौर ऊर्जा प्रकल्प, गावाची सुरक्षा वाढविणे, ग्रंथालयासह रस्ते पक्के व्हावेत आदी प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या.

यावेळी निवृत्त क्रिडा शिक्षक एस. एन. देवरे, आदर्श शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष धनराज. डी. विस्पुते, निवृत्त शिक्षक एम. बी. शिंदे, जेष्ठ लिपीक वसंतराव देवरे, ग. स. बॅंकेचे माजी संचालक वसंतराव देवरे, वंसत भामरे, सैनिक संजय देवरे, शरद देवरे, प्रशांत देवरे उपस्थित होते.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com