काही राजकीय पक्षाचे घटक नैराश्यातून बंदचा निर्णय घेतात हे दुर्दैव!

शरद पवार (sharad pawar) म्हणाले, ''त्रिपुरा हिंसाचार प्रकरण घडलं (tripura maharashtra violence) म्हणून महाराष्ट्रात अस घडणं योग्य नाही,''
sharad pawar
sharad pawarsarkarnama
Published on
Updated on

नाशिक : ''राज्य सरकार चांगलं काम करत असतांना काही जण या निमित्ताने अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतात. काही राजकीय पक्षाचे घटक सार्वजनिक शांततेला धक्का बसण्यासाठी नैराश्यातून बंद निर्णय घेत आहेत. हा प्रकार दुर्दैवी आहे,'' असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (sharad pawar) यांनी केले. ते माध्यमांशी बोलत होते. पवार हे सध्या नाशिक दैाऱ्यावर आहेत.

शरद पवार (sharad pawar) म्हणाले, ''त्रिपुरा हिंसाचार प्रकरण घडलं (tripura maharashtra violence) म्हणून महाराष्ट्रात अस घडणं योग्य नाही. महाराष्ट्रात काही संघटना अशा घटना करतात हे योग्य नाही. राज्यातील काही मोजक्या भागात या घटना घडल्या. या प्रवृत्तींना किती महत्व द्यायचं हे लोकांनी ठरवावं''

सोनोशी (ता. इगतपुरी) येथे रविवारी आदिवासी क्रांतिकारकांच्या संयुक्त जयंतीनिमित्त स्मारकाच्या भूमिपूजन शरद पवार यांच्या हस्ते झाले. विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ, राहीबाई पोपेरे, पालकमंत्री छगन भुजबळ, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, माजी खासदार देवीदास पिंगळे, आमदार माणिकराव कोकाटे, हिरामण खोसकर, किरण लहामटे, नितीन पवार, सुनील भुसारा, दौलत दरोडा, अशोक भांगरे, माजी आमदार शिवराम झोले, निर्मला गावित यावेळी प्रमुख पाहुणे होते.

sharad pawar
मोठी बातमी : कॉग्रेसकडून विधानपरिषदेसाठी प्रज्ञा सातव यांचे नाव निश्चित

पवार म्हणाले, ''स्वतः नक्षली भागाचा दौरा करून त्यांच्या अडीअडचणी, दुःख समजून घेणार आहे. राज्य सरकारच्या वतीने आवश्यक त्या ठिकाणी आपण प्रयत्न करणार आहे. या देशाचा मूळ मालक असलेल्या आदिवासींची अवस्था आज बिकट आहे. त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, बिरसा मुंडा यांचा इतिहास, त्यांची आठवण म्हणून या ठिकाणी भव्यदिव्य असे आंतरराष्ट्रीय स्मारक उभे करायचे आहे,''

'खरा आदिवासी हा सर्वांच्या हिताचा विचार करतो. तो कोणावरही अन्याय करत नाही. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना नक्षली ठरवणे चुकीचे आहे. आदिवासी कधीही नक्षली असू शकत नाही,'' असे शरद पवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com