‘राष्ट्रवादी पुन्हा...’ हे गाणे वाजवून केले चंद्रकांत पाटील यांचे स्वागत!

विनापरवाना साउंड सिस्टीम उभारण्यात आली होती, त्यामुळे संबंधितांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Chandrakant Patil
Chandrakant PatilSarkarnama
Published on
Updated on

पुणे : भारतीय जनता पक्षाचे (BJP) वरिष्ठ नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या कार्यक्रमात चक्क राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) प्रचाराचं गाणं वाजविण्यात आले. चंद्रकांतदादा कार्यक्रमाला येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रचार गीत असलेले ‘राष्ट्रवादी पुन्हा...’ वाजविल्याने पुणे शहरात त्याची एकच चर्चा सुरू झाली आहे. (Chandrakant Patil was welcomed by playing the campaign song of NCP)

दिवाळीनिमित्त पुण्यातील रास्ता पेठेत असलेल्या एका कार्यक्रमात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हजेरी लावली होती. चंद्रकांत पाटील कार्यक्रमात येताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रचार गीत वाजविण्यात आले, त्यामुळे पालकमंत्र्यांच्या स्वागताला राष्ट्रवादीचे प्रचार गीत लावण्यात आली की काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

Chandrakant Patil
ऊसदरासाठी शेतकरी संघटना आक्रमक; सोलापुरात चार ट्रॅक्टरचे टायर फोडले; कोल्हापुरात वाहतूक रोखली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनापरवाना साउंड सिस्टीम उभारण्यात आली होती, त्यामुळे संबंधितांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रास्ता पेठेतील एका कार्यक्रमावेळी चंद्रकांत पाटील आल्यानंतर उपस्थितीत ‘डीजे’वर अचानक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रचार गीत लागले आहे, त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच खसखस पिकली.

Chandrakant Patil
अंधेरी पोटनिवडणुकीत ट्विस्ट : अर्ज माघारीसाठी दबाव टाकला; अपक्ष उमेदवाराच्या तक्रारीची आयोगाकडून दखल

दरम्यान, पुणे पोलिसांनी डीजे चालकाला ताब्यात घेतले आहे. साऊंउ सिस्टीम विनापरवाना लावण्यात आली होती, असे कारण देत डीजे चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निवडणूक प्रचारकाळात राष्ट्रवादीकडून वाजविण्यात येणारे ‘राष्ट्रवादी पुन्हा....’ हे गीत प्रचंड गाजले आहे. ग्रामीण भागात अनेकदा परण्याच्या कार्यक्रमातही ‘राष्ट्रवादी पुन्हा...’ हे गाणं वाजविण्यात येतं. पण, कट्टर विरोधक असलेल्या भाजपच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रचारगीत वाजविण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. अचानकपणे हे गाणं वाजल्याने अनेकांकडून सखेद आश्चर्यही व्यक्त करण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com