Nilesh Lanke On Sujay Vikhe : 'विखे-गडाख 1991'च्या निवडणुकीचा दाखला दिला; खासदार लंकेंनी विखेंची 'परंपराच' काढली

Nilesh Lanke reaction to Sujay Vikhe EVM verification : नगर दक्षिणल लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेले भाजप उमेदवार सुजय विखे यांनी ईव्हीएम पडताळणीची मागणी म्हणजे, त्यांना पराभव मान्य नाही. त्यांनी समाजाची दिशाभूल करताना पराभव मान्य करायला शिकले पाहिजे, असा टोला खासदार नीलेश लंके यांनी लगावला.
Nilesh Lanke On Sujay Vikhe
Nilesh Lanke On Sujay VikheSarkarnama
Published on
Updated on

Nilesh Lanke News : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार सुजय विखे यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीवरून खासदार नीलेश लंके यांनी चांगलेच सुनावले.

"बाळासाहेब विखे आणि यशवंतराव गडाख यांच्यातील 1991 च्या निवडणुकीचा दाखल देत ही विखे यांची परंपरा आहे. ईव्हीएमवर खापर फोडण्यापेक्षा पराभव मान्य करा. सुजय विखे यांची मागणी म्हणजे, त्यांना त्यांचा पराभवच मान्य नाही, असा अर्थ होतो", असे खासदार लंके यांनी म्हटले.

भाजपचे (BJP) नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार सुजय विखे यांनी ईव्हीएम तसेच व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी केली. श्रीगोंदा 10, पारनेर 10, नगर, शेवगांव-पाथर्डी, कर्जत-जामखेड आणि राहुरी येथील प्रत्येकी 5 मतदान केंद्रांवरील मशीन पडताळणीची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यासाठी त्यांनी शुल्क देखील जमा केले आहे. सुजय विखे यांच्या पडताळणीच्या मागणीवर खासदार लंके यांनी विखेंना पराभव मान्य नाही. त्यांनी त्यांच्या पराभवाचे खापर ईव्हीएम फोडण्यास सुरवात करत भाजप सरकारला घरचा आहेर दिला आहे, अशा शब्दात विखे यांच्या पडताळणीला खासदार लंकेंनी फटकारले आहे. ॉ

Nilesh Lanke On Sujay Vikhe
Sujay Vikhe Patil : भाजपचे पराभूत उमेदवार विखेंना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवर शंका; लढत न्यायालयाच्या दिशेनं?

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे खासदार नीलेश लंके म्हणाले, "विखे यांच्या मागणीचा दुसऱ्या बाजूने विचार केल्यास त्यांना त्यांचा पराभवच मान्य नाही. निवडणुकीत विजय आणि पराभव पचवता आला पाहिजे. तसे पाहायला गेल्यास विखे कुटुंबाला राजकीय परंपरा आहे". सुजय विखे यांच्या या भूमिकेवरून आजोबा खासदारसाहेब बाळासाहेब विखे आणि यशवंतराव गडाख यांच्यातील 1991 मधील निवडणूक समोर येते. गडाख जनतेतून विजयी झाले होते. त्यावेळीही बाळासाहेबांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. तत्कालीन निवडणूक आयुक्त टी. एन. शेषण यांच्याकडे जात आक्षेप नोंदवला. पुढे काय झालं हे सर्वश्रुत आहे. सुजय विखे यांच्या भूमिकेमुळे असे दिसते की, त्यांना पराभव पचवता येत नाही, असे खासदार लंके यांनी थेट म्हटले.

Nilesh Lanke On Sujay Vikhe
Nilesh Lanke and Balasaheb Thorat : नीलेश लंके यांचे बाळासाहेब थोरातांबाबत मोठं भाकीत; 'सरकार येणार अन् थोरात...'

खासदार नीलेश लंके यांनी सुजय विखेंना तुम्ही पराभव मान्य करायला शिका. समाजापुढे जाताना समाजाला सांगू शकत नाहीत की, मी माझ्या कर्तृत्वामुळे पराभूत झालो आहे. ईव्हीए आणि व्हीव्हीपॅटमध्ये घोटाळा झाल्याचे सांगून समाजाची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे. अधिकाऱ्यांनी सहकार्य केले नाही. सुजय विखे ही आदळआपट करण्यापेक्षा त्यांनी पराभव मान्य करायला शिकावे, असा सल्ला दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com