Ahmednagar News : माजी मंत्री शंकरराव गडाखांच्या दूध संघाचा वीज पुरवठा तोडला

Shankarrao Gadakh Patil : नेवासा तालुका दुध संघातील दहा वर्षापुर्वीच्या वीजचोरी प्रकरणी गुन्हा दाखल
Shankarrao Gadakh Patil
Shankarrao Gadakh Patil Sarkarnama
Published on
Updated on

सोनई : (अहमदनगर) आमदार शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या नेवासा तालुका दुध संघाने एक कोटी २४ लाख रुपयांची वीजचोरी केल्याप्रकरणी आज महावितरण कंपनीने तेथील वीजपुरवठा तोडला आहे.

नेवासे न्यायालयाने वीज तोडण्यास स्थगिती दिलेली असताना ही कारवाई झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

दूध संघाने आठ ते दहा वर्षापूर्वी वीजचोरी केल्याची फिर्याद मागील महिन्यात महावितरणने केली होती. यामध्ये आमदार गडाख यांचे मृत्यूशी झुंज देत असलेले बंधू प्रशांत गडाख, चुलत भाऊ प्रविण गडाख व अन्य सतरा संचालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घटनेत तालुक्यातील राजकीय विरोधकांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप काल रविवारी (ता.५) रोजी जेष्ठ नेते यशवंतराव गडाख व आमदार गडाख यांनी सोनईतील मेळाव्यात केला होता.

Shankarrao Gadakh Patil
High Court News : विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले, पण खंडपीठाच्या आदेशाने सरपंचपद कायम..

आज सोमवारी सायंकाळी चार वाजता महावितरणचे कर्मचारी वीज तोडण्यास आले असता त्यांना दुध संघातील कर्मचाऱ्यांनी न्यायालयाचा स्थगिती आदेश दाखवूनही संस्थेपासून चार खांब ओलांडून वीज तोडण्यात आली.

यापुर्वी दुध संघाचे नुकसान होवू नये म्हणून २२ फेब्रुवारी रोजी वीज तोडण्यास स्थगिती मिळवूनही त्याच दिवशी रात्री महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीज तोडून न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला होता. संघाने अवमान याचिका दाखल करताच २८ फेब्रुवारीला वीज जोडून दिली होती.

Shankarrao Gadakh Patil
Chinchwad By Election : अश्विनी जगतापांच्या विजयासाठी तानाजी सावंतांच्या ‘नेटवर्क’ने बजावली मोलाची भूमिका

मागील महिन्यात वीज तोडल्याने संघात संकलन झालेल्या दुधाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आजच्या कारवाईने संघाच्या अडचणीत भर पडल्याने दुध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर वाढत आहे.

तालुक्यातील शेतकरी, दुध उत्पादक व कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर या कारवाईचा निषेध करण्यास सुरुवात केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com