Nashik News : राज्यातील निम्म्याहून अधिक सहकारी संस्था तसेच नागरी सहाकरी बॅंकांवर प्रशासक नियुक्त करण्यात आल्याची खंत राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी व्यक्त केली. (Cooperative bank cofrence took place at Nashik)
दि महाराष्ट्र (Maharashtra) राज्य सहकारी बँक्स असोसिएशनतर्फे (Co-operative) दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या रौप्यमहोत्सवी पुरस्कारांचे वितरण शनिवारी प्रभू यांच्या उपस्थितीत झाले,
या वेळी आज बँकिंग क्षेत्रात अतिशय वेगाने बदल होत आहेत. तंत्रज्ञानाने सर्व क्षेत्र व्यापली आहेत. अशा स्थितीत नागरिक मात्र सहकारापासून लांब जात आहेत. त्यामुळे सहकारी बँका वाचवायच्या असतील, तर आत्मपरीक्षण करावे लागेल, अशी कानउघाडणी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केली.
राष्ट्रीय सहकार धोरण समितीचे अध्यक्ष सुरेश प्रभू यांनी समाज व सहकारातील दरी कमी करावी लागेल. ग्राहकांशी वैयक्तिक पातळीवर नाते जोडावे लागेल. बँकांनी ग्राहकाभिमुखता जपली पाहिजे. त्यासाठी अधिकाधिक लोकाभिमुखतेसाठी आत्मपरीक्षणाबरोबरच सहकारातील सात्त्विकता जपावी, असे आवाहन केले.
निम्म्या संस्थांवर प्रशासक
राज्यातील निम्म्याहून अधिकारी सहकारी, नागरी बॅंकांवर प्रशासक असल्याची खंत व्यक्त करीत सहकार आयुक्त कवडे म्हणाले, की या संस्थांशी सुसंवाद वाढवून अनेक संस्था अडचणीतून बाहेर काढण्यास यश मिळाले आहे. हीच सहकाराच्या समृद्धीची यशस्वी वाटचाल ठरेल. त्यासाठी व्यवस्थापनातील सिद्धता, कौशल्य विकास, मूल्यव्यवस्था, सामाजिक योगदान, सामाजिक दायित्व यांचा अंगीकार करावा, असे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी सांगितले.
या वेळी महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रह्मेचा, सहकार भारतीच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. शशीताई अहिरे, बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास ठाकूर, उपाध्यक्ष वसंतराव घुईखेडकर, असोसिएशनचे संचालक गुलाबराव देवकर, डॉ. दिगंबर दुर्गाडे, प्रंचित पोरेड्डीवार, रूपा देसाई-जगताप, भाऊ कड, सुभाष जोशी, रवींद्र दुरुगकर, कैलास जैन, जगन्नाथ बिंगेवार, राजेंद्र महल्ले, दिलीप चव्हाण, योगिनी पोकळे, किशोर रांगणेकर उपस्थित होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.