Dhule politics : महाराष्ट्रात एकही लव्ह जिहाद प्रकरण नाही, भाजप केवळ राजकारण करते!

Following Congress Samajwadi Party also started yatra-काँग्रेसपाठोपाठ समाजवादी पक्षानेही सुरू केली जनसंवाद यात्रा!
Fahad Ahemad
Fahad AhemadSarkarnama
Published on
Updated on

Dhule Samajwadi Party News : जिल्ह्यात काँग्रेसची जनसंवाद यात्रा सुरू आहे. त्याला चांगला प्रतिसाददेखील मिळत आहे. असे असतानाच काल समाजवादी पक्षानेही शहरात महाराष्ट्र जनसंवाद यात्रेचा कार्यक्रम केल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे. (PM Modi ignores the basic issues of the people)

काँग्रेस (Congress) पक्षाच्या यात्रेनंतर समाजवादी पक्षातर्फे (Samajwadi Party) उत्तर महाराष्ट्रात जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले. धुळे (Dhule) शहरात झालेल्या या कार्यक्रमात त्यांनी भाजपवर (BJP) टीका केली.

Fahad Ahemad
Nashik Co-operative News : समाजाला सहकार क्षेत्राविषयी आदर राहिलेला नाही

या वेळी समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष फहाद अहमद यांनी पत्रकार परिषदेत भाजप व केंद्रातील सरकारवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, देशभरात महागाई, बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. मात्र, जाती-धर्मांत तेढ निर्माण करून मोदी सरकार मूळ प्रश्नांना बगल देत आहे. राज्यात ट्रिपल इंजिन सरकार असताना धुळेकर तहानलेले कसे, असा प्रश्‍नदेखील त्यांनी केला.

अहमद म्हणाले, की भाजपच्या सत्ताकाळात महागाई, बेरोजगारी वाढली आहे. लोकांच्या समस्या सोडविणे हा राजकारणामधील प्रमुख हेतू असतो. मात्र, आज तसे घडताना दिसत नाही. सर्व जाती-धर्मांत तेढ निर्माण करण्याचे काम मोदी सरकार करीत आहे. परिणामी, जनतेमधील सुसंवाद कमी झाला आहे. देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. मुस्लिम बांधवांवर ठिकठिकाणी अन्याय, अत्याचार होत आहेत.

Fahad Ahemad
Pankaja Munde News : माझी नीतिमत्ता लेची-पेची नाही; सत्व-तत्त्व-नमत्व माझं राजकारण; पंकजा मुंडेंनी घेतला विरोधकांचा समाचार

पैसा बड्यांच्या घशात

सरकारने जनतेच्या पैशांची लूट चालविली आहे. जनतेचा पैसा बड्या उद्योजकांच्या घशात घातला जात आहे. तो पैसा विविध मार्गांनी वळता करून भ्रष्टाचार सुरू आहे. सत्तेत येण्यापूर्वी स्वीस बँकेतून काळा पैसा आणण्याचे आश्वासन मोदी सरकारने दिले होते, त्याचे काय झाले? नऊ वर्षांत काळा पैसा मिळालेला नाही. महाराष्ट्राची भूमी संतांची, महापुरुषांची म्हणून ओळखली जाते. मात्र, येथेही जाती- धर्मांत आरक्षणासारख्या मुद्द्यांवरून भांडणे लावली जात आहेत.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com