शिवसेनेला धक्का...डॉ. विक्रांत मोरे यांचा भाजपमध्ये प्रवेश

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथे डॉ. विक्रांत मोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
Dr. Vikrant More With BJP leaders.
Dr. Vikrant More With BJP leaders.Sarkarnama
Published on
Updated on

नंदुरबार : येथील युवा नेते डॉ. विक्रांत मोरे (Dr. Vikrant Omre) यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) व भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचा प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी त्यांचा प्रवेशाचे जोरदार स्वागत केले आहे. (Nandurbar BJP leaders welcomes Dr More`sjoining BJP)

Dr. Vikrant More With BJP leaders.
शिवसेनेच्या नगरसेवकांची आज उद्धव ठाकरे घेणार एकनिष्ठतेची शिकवणी!

शिवसेनेचे नंदुरबार जिल्हाप्रमुख म्हणून निष्ठेने पक्षाचे काम करीत जिल्ह्याचा कानाकोपऱ्यात शिवसेनेचा भगवा पोचविण्याचे काम येथील डॉ. विक्रांत मोरे यांनी केले आहे. पक्षाचा माध्यमातून गोर गरीब जनतेचे व विद्यार्थी आणि युवकांचे प्रश्‍न सोडवून संघटना वाढविली. एवढेच नव्हे तर नंदुरबार पालिकेचा निवडणुकीत चार नगरसेवक निवडून आणत शिवसेनेला उपनगराध्यक्षपद मिळविण्याचा इतिहास त्यांनी घडविला.

Dr. Vikrant More With BJP leaders.
शिवसेनेचा अखेर स्वबळाचा नारा; आदित्य ठाकरे लवकरच पुणे दौऱ्यावर!

असे विविध उपक्रम करूनही पक्षिय पातळीवर वरिष्ठांकडून कामाची दखल घेतली जात नव्हती, अनेक निर्णय जिल्हा प्रमुखांना माहिती नसतानाच परस्पर होऊ लागले. यासह अनेक कारणांमुळे डॉ. विक्रांत मोरे यांनी दोन महिन्यापूर्वीच आपल्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला होता.

त्यांचा राजीनामा मंजूर न करता वरिष्ठ नेत्यांनी त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्नही केला. मात्र त्यांनी सत्तेत असलेल्या पक्षाचा व पक्षप्रमुख मुख्यमंत्री असताना कोणतीही लालसा न बाळगता राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम राहिले. त्यांनी भाजपत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. मात्र प्रवेशासाठी वरिष्ठ नेत्यांच्या वेळेअभावी अधिकृत प्रवेश रखडला होता.

अखेर मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार डॉ. हीना गावित, माजी आमदार तथा युवा नेते शिरीश चौधरी, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या उपस्थितीत डॉ. मोरे यांचा भाजप प्रवेश झाला. यावेळी नगरसेवक प्रवीण गुरव, मनीष बाफना, अर्जुन मराठे, मनोज चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com