Nashik ZP News: नाशिकच्या मिनी मंत्रालयात महिला कर्मचाऱ्यांच्या शोषणाचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका महिलेने तक्रार दिल्यानंतर संबंधित विभाग प्रमुख अधिकाऱ्याच्या गैरप्रकार यांची लांबलचक यादीच बाहेर आल्याचे कळते. धक्कादायक म्हणजे प्रसुतीच्या रजेची मागणी करणाऱ्या नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेला अधिकाऱ्याने दिवसभर कार्यालयाच्या दारात उभे केल्याची तक्रार आहे.
शासकीय कार्यालयांमध्ये महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ आणि शोषण रोखण्यासाठी सातत्याने घोषणा केल्या जातात. मात्र वरिष्ठांच्या अधिकाराचा धाक आणि परिस्थिती यामुळे याबाबत क्वचितच महिला तक्रार करण्यास पुढे येतात. त्यामुळे अनेक प्रकार घडले जातात, असा अनुभव आहे. अशीच एक धक्कादायक महिला शोषणाची मालिका नाशिकच्या जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्याने केल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.
नाशिकच्या मिनी मंत्रालयात मात्र या सर्वांवर कडी होईल असा प्रकार उघडकीस आला आहे. एका महिला कर्मचाऱ्याने याबाबत तक्रार केल्यावर संबंधित विभाग प्रमुखांचा ट्रॅक रेकॉर्डच पुढे आला. नाशिकच्या कार्यालयातील 30 महिलांचा लैंगिक छळ झाल्याची तक्रार यातून पुढे आली आहे.
विशेष म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी गेल्या काही वर्षांपासून महिलाच आहेत. असे असतानाही विभाग प्रमुख असलेल्या एका पुरुष अधिकाऱ्याने आपल्या पदाचा दुरुपयोग केला. महिला कर्मचाऱ्यांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत त्यांचे लैंगिक शोषणाचे प्रकार पुढे आल्याचे कळते.
यासंदर्भात एका महिलेने तक्रार केल्यानंतर हा प्रकार किती व्यापक आहे याची जाणीव झाली. महिलांच्या लैंगिक शोषणाबाबत कार्यवाही आणि चौकशीसाठी प्रत्येक कार्यालयात विशाखा समिती कार्यरत आहे. मात्र या समित्या खरोखर किती गंभीर आहेत?
यावर देखील या निमित्ताने प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आपल्या वरिष्ठ पदाचा गैरफायदा घेऊन संबंधित महिला कर्मचाऱ्यांच्या असहाय्यतेचा लाभ या अधिकाऱ्यांनी घेतला. अनेक महिला कर्मचाऱ्यांवर प्रेमाचे जाळे टाकण्यात आले. त्यासाठी अनेक गैरप्रकार आणि कार्यालयीन वेळ व कार्यालयानंतर देखील संबंधित महिलांची संपर्क आणि अन्य प्रकारे त्रास देण्याचे प्रकार घडले घडले.
धक्कादायक म्हणजे प्रसुती रजा नियमाने बंधनकारक आहे. असे असताना अपेक्षित सहकार्य करत नसलेल्या एका गर्भवती महिलेचा छळ झाला. या महिलेवर संबंधित अधिकारी शोषणाचे प्रयत्न करीत होता.
मला दाद न मिळाल्याने नऊ महिन्यांची गर्भवती असलेल्या या महिलेला रजेसाठी तुमच्या विरोधात तक्रारी आहेत असे सांगून दिवसभर गर्भवती अवस्थेत कार्यालयाच्या गेटवर उभे ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या अमानुष प्रकारानंतर देखील संबंधित अधिकारी निर्धास्त होता.
नाशिकच्या मिनी मंत्रालयात विभाग प्रमुख असलेल्या एका अधिकाऱ्याबाबत विशाखा समितीकडे एक तक्रार आली होती. महिला अधिकाऱ्यानेच ही तक्रार करण्यासाठी पुढाकार घेतला होता. महिला अधिकारी पुढे आल्याने अन्य महिला कर्मचाऱ्यांना देखील धीर आल्याने हा प्रकार उघड झाला.
मिनी मंत्रालयात तब्बल 30 महिला कर्मचाऱ्यांनी आपला लैंगिक शोषण आणि छळ झाल्याची तक्रार विशाखा समितीकडे केली आहे. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशी मागितल यांनी या तक्रारी आल्याचे मान्य केले. यासंदर्भात तातडीने चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीचा अहवाल येताच संबंधित अधिकाऱ्यावर आणि दोषींवर गंभीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.