

Sujay Vikhe Ahilyanagar MP election : अहिल्यानगरच्या दक्षिण लोकसभा मतदारसंघातील पराभवावर भाष्य करताना, सुजय विखे पाटील यांनी सूचक इशारा दिला आहे. श्रीरामपूर इथं त्यांनी पत्रकार परिषदेत खासदारकीच्या निवडणुकीतील पराभव मोठं भाष्य केलं आहे.
'एका समाजाने मतदानाचे फतवे काढले होते. तेथून धार्मिक तेढ वाढण्यास सुरूवात झाली. विधानसभा निवडणुकांमध्ये हिंदू संघटित झाल्याचे त्यातून पाहायला मिळाले,' असे सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या (Election) पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना अहिल्यानगर जिल्ह्यात वेग आला आहे. विखे पाटील परिवार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सक्रिय झाला आहे. यावेळी निवडणुकीत वेगवेगळे प्रयोग असल्याचे संकेत मिळू लागले आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत संदर्भ घेत, जुना इतिहास खोदून काढून स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक वेगळ्या पातळीवर लढली जाईल, असे संकेत मिळू लागले आहे.
श्रीरामपूर इथं सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) दौऱ्यावर होते. तिथं त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना, अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील पराभव भाष्य करताना, आगामी काळातील राजकीय परिस्थितीवर सूचक इशारा दिला आहे. त्यामुळे सुजय विखे पाटील यांनी केलेल्या विधानाला, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.
सुजय विखे पाटील म्हणाले, "अहिल्यानगर दक्षिणमध्ये लोकसभा निवडणुकीत विकासाच्या प्रश्नावर मतदान झाले नाही. एका समाजाने मतदानाचे फतवे काढले होते. तेथून धार्मिक तेढ वाढण्यास सुरुवात झाली. विधानसभा निवडणुकांमध्ये हिंदू संघटित झाल्याचे त्यातून पाहायला मिळाले."
'पुढील काळात विकासाच्या मुद्यावर मतदान झाले, तर दोन समाजामधील वितुष्ट संपुष्टात येईल. तोच माझा प्रयत्न आहे. अन्यथा येत्या काळात आणखी आमदार संग्राम जगताप तयार होतील,' असा सूचक इशारा विखे पाटील यांनी दिला.
आमदार हेमंत ओगले यांनी कामांचे श्रेय घेत असल्याच्या प्रश्नावर विखे पाटील यांनी फटकारे लगावले. ते म्हणाले, "ओगले हे माझे जुने मित्र आहेत. परंतु पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मंजूर झालेल्या कामांचे श्रेय इतरांनी घेऊ नये. विरोधी आमदार असूनही श्रीरामपूरसाठी चार कोटी रुपयांचा निधी पालकमंत्र्यांनी दिला आहे. श्रीरामपूरचा विकास हा सामूहिक प्रयत्न आहे."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.