Balasaheb Thorat : स्वातंत्र्य चळवळीत खानदेशचे मोठे योगदान!

फैजपूर येथे राजू तडवी यांनी काँग्रेस पक्षात माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार शिरीष चौधरी यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
Congress leaders with Balasaheb Thorat
Congress leaders with Balasaheb ThoratSarkarnama
Published on
Updated on

फैजपूर : ब्रिटिश काळात (British era) १९३६ मध्ये काँग्रेसचे (Congress) पहिले ग्रामीण अधिवेशन फैजपूरला (Faizpur) झाले. स्वातंत्र्य चळवळीत (Independence movement) खानदेशचे मोठे योगदान आहे. (स्व.) राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांनी महिलांना आरक्षण देण्याचे काम केले. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला सरपंच, नगराध्यक्ष होऊन राजकारणात पुढे येऊन लोकशाही बळकट करीत आहे, असे प्रतिपादन माजी महसुलमंत्री तथा विधिमंडळ गटनेते आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केले. (Congress Azad Gaurav yatra`s conclusion at Faizpur)

Congress leaders with Balasaheb Thorat
Shinde Government: लाल दिव्याची हवा डोक्यात गेल्यास विकासाचा चक्काचूर होतो!

काँग्रेसची ‘आझाद गौरव’ यात्रेच्या समारोपनिमित्त शहरातील खंडोबा देवस्थानमध्ये बुधवारी सायंकाळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ‘आझाद गौरव’ यात्रेच्या माध्यमातून तळागाळातील नागरिकांच्या समस्या समजून घेण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे माजी मंत्री थोरात यांनी सांगितले. प्रभाकर सोनवणे यांनी प्रास्ताविक केले.

Congress leaders with Balasaheb Thorat
Chhagan Bhujbal: नाशिकसाठी काही केले, की ते पळवण्याचा चंगच!

या वेळी जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, आमदार शिरीष चौधरी, डॉ. सुधीर तांबे, डॉ. उल्हास पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. या वेळी व्यासपीठावर आमदार शिरीष चौधरी, आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी खासदार उल्हास पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महिला सुलोचना वाघ, संदीप भय्या पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, अजाबराव पाटील, ज्ञानेश्वर कोळी, दिलरुबाब तडवी व्यासपीठावर उपस्थित होते. तर कार्यक्रमाला लिलाधर चौधरी, शेखर पाटील, केतन किरंगे, कलीम मन्यार, काँग्रेस शहराध्यक्ष शेख रियाज मिस्तरी, सरपंच राहुल तायडे, चंद्रकला इंगळे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष वसीम तडवी आदी उपस्थित होते. धनंजय चौधरी यांनी सूत्रसंचालन केले.

माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी येथील धनाजी नाना महाविद्यालयातील प्रेरणा स्तंभाला भेट देऊन पुष्पचक्र वाहिले. यानंतर पायी ‘आझाद गौरव’ यात्रा काढून फैजपूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून खंडोबा देवस्थान येथे आझाद गौरव यात्रेच्या समारोप जाहीर सभा झाली.

यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

युसूफ उर्फ शेख जलिल हाजी अब्दुल सत्तार, राजू तडवी इंजिनिअर, डॉ. दानिश शेख, शरीफ मलिक, असलम तडवी, शेख एजाज शेख हारून, सद्दाम इकबाल, सरफराज तडवी यांच्यासह कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये माजी मंत्री थोरात व आमदार चौधरी यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com