Shani Shingnapur temple employees arrested : श्री शनैश्वर देवस्थान बनावट अ‍ॅपप्रकरणी दोघांना अटक; सुरुवात कर्मचाऱ्यांपासून...

Two Employees of Shani Shingnapur Temple Arrested in Fake App Case at Newasa : नेवासा इथल्या श्री शनैश्वर देवस्थानच्या बनावट अ‍ॅपप्रकरणी अहिल्यानगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
Shani Shingnapur temple employees arrested
Shani Shingnapur temple employees arrestedSarkarnama
Published on
Updated on

Shani Shingnapur fake app case : राज्यासह देशात चर्चेत असलेला आणि विधिमंडळाच्या मागील अधिवेशनात गाजलेला शनिशिंगणापूर इथल्या श्री शनैश्वर देवस्थानच्या अ‍ॅप घोटाळ्याप्रकरणी अहिल्यानगरमधील सायबर पोलिसांनी कारवाई करत देवस्थानच्या दोघा कर्मचाऱ्यांना गुरूवारी रात्री अटक केली.

सचिन शेटे आणि संजय पवार, अशी अटक केलेल्यांची नावे असून, या दोघांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.

अ‍ॅप घोटाळ्याप्रकरणी शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात सायबर पोलिसांनी गुन्हा (cyber crime) दाखल केला. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सागर ढिकले या गुन्ह्याचा तपास करत आहेत. देवस्थानच्या अधिकृत परवानगीतील तीन अ‍ॅप व्यतिरिक्त आणखी चार बेकायदेशीर अ‍ॅप आढळून आले.

या माध्यमातून जमा झालेल्या देणग्यांपैकी काही निधी दोघा कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात वळवला गेल्याचे पोलिस तपासात उघड झाले. पोलिसांनी (Police) देवस्थान विश्वस्त, कर्मचारी व पुजाऱ्यांची चौकशी केली आहे. संशयास्पद व्यवहार झालेली बँक खाती तपासली असून अ‍ॅपच्या माध्यमातून पैशांची आवक-जावक कशी झाली, कोणाकडे निधी पोहोचला याची माहिती घेतली आहे.

Shani Shingnapur temple employees arrested
Top 10 News : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत सर्किट बेंचचा मोठा निर्णय; संसदेत पोहोचला ‘टीईटी’चा मुद्दा; महायुतीतून शिवसेना आऊट? यासह वाचा Top Ten राजकीय घडामोडी...

दरम्यान सचिन शेटे व संजय पवार या दोघांकडे सायबर पोलिसांनी चौकशी केली व त्यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीत काय समोर येणार यावर गुन्ह्याचा पुढचा तपास ठरणार आहे. उशिरा का होईना पण सायबर पोलिसांनी या गुन्ह्यात दोघांना अटक केली असल्याने पुढील तपासाला गती येणार आहे. या दोघांना आज न्यायालयासमोर हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Shani Shingnapur temple employees arrested
Maharashtra politics clash: सराईत गुन्हेगार ते 307 दाखल... चंद्रकांत पाटील-एकनाथ खडसे भिडले; सगळी हिस्ट्रीच काढली!

न्यायालयासमोर हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. काँग्रेसचे संभाजी माळवदे , भाजपचे ऋषिकेश शेटे, वैभव शेटे यांनी या बनावट अ‍ॅपसंदर्भात सुरुवातीला आवाज उठवला. ज़िल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रारी अर्ज दाखल केले. देवस्थानामधील बनावट ॲप प्रकरण व यामध्ये कोट्यवधींचा घोटाळाप्रकरणात सायबर शाखा पोलिसांनी शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com