

Sangamner police case : डाॅक्टर असल्याचं भासवून आयुर्वैदिक औषध देणाऱ्या चौघा मुन्नाभाईंचा (बोगस डाॅक्टर) सरपंच संदीप देशमुख यांच्या सतर्कतेमुळे पर्दाफाश झाला.
छत्रपती संभाजीनगरमधील या चौघा बोगस डाॅक्टरांविरोधात संगमनेर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल घुले यांनी फिर्याद दिली आहे.
डॉ. वसंत लांडगे (रा. नाईकनगर, सेवालाल मंदिराजवळ, छत्रपती संभाजीनगर), सतीश शिरसाट (वय 37, रा. रामनगर, सिडको एन-2, प्रकाशनगर, छत्रपती संभाजीनगर), अरुण सरोदे (वय 49, रा. नाईकनगर सेवालाल मंदिराजवळ, छत्रपती संभाजीनगर) आणि आदित्य लांडगे (वय 27, रा. नाईकनगर, सेवालाल मंदिराजवळ, छत्रपती संभाजीनगर) अशी गुन्हा (Crime) दाखल झालेल्या चौघांची नावे आहेत.
वैद्यकीय शैक्षणिक पात्रता नसतानाही नागरिकांना डॉक्टर असल्याचे भासवून आयुर्वेदिक औषधी हे चौघे देत होते. निमोणचे सरपंच (Sarpanch) संदीप देशमुख गावातून जात असताना त्यांना श्री मारुती मंदिरात नागरिकांची गर्दी दिसली. अनेक जण बाहेरगावाहून आले होते. छत्रपती संभाजीनगर येथून कुणीतरी डॉक्टर आले असून ते नागरिकांना औषधे देत असल्याची माहिती त्यांना नागरिकांकडून मिळाली.
याबाबत सरपंच संदीप देशमुख यांनी अधिक खात्री केली. हे डॉक्टर (Doctor) बोगस असल्याचा त्यांना संशय आला. अधिक चौकशी केल्यावर या चौघांकडे वैद्यकीय अभ्यासक्रमाशी निगडीत कोणतीही डिग्री नव्हती. यामुळे सरपंच देशमुख यांना या चौघांविरोधात अधिकच संशय बळावला.
हा सर्व प्रकार नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा असल्याने, सरपंच देशमुख यांनी संगमनेर शहरातील काही वरिष्ठ डॉक्टरांशी फोनद्वारे संवाद साधला. तसेच निमोण येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. घुले यांना संदर्भात माहिती दिली. डॉ. घुले यांच्यासह वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे पथक गावात दाखल झाले.
डॉ. घुले आणि वैद्यकीय पथकांनी या चौघांकडे उलट तपासणी केली. चौघांकडे वैद्यकीय शिक्षण घेतल्याचे पुरावे मागितले. औषधी विक्रीचा परवाना मागितला. तसेच ही औषधे नेमकी कोणत्या स्वरूपाची त्याची माहिती घेतली. याबाबत विचारणा केली असता त्यांनी सकारात्मक माहिती देता आली नाही.
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकात हे चौघे बोगस डाॅक्टर असल्याचे समोर आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल घुले यांनी फिर्याद दिली. या चौघांकडून औषधांचा साठा जप्त करण्यात आला आहे. त्यातील काही नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहे. विक्री करत असलेली औषधे नेमकी कोणती आहेत, याची तपासणी होईल. यानंतर अधिक वाढीव कलम लावले जातील, असे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक एम. व्ही. शिंदे तपास करीत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.