Niphad Maratha News: अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ येथील शेतकरी वाल्मीक बोरगडे यांनी सुरू केलेले उपोषण पाचव्या दिवशीही सुरूच आहे. त्याला नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे, त्यामुळे या उपोषणाची जिल्हाभर चर्चा सुरू आहे. (Valmik borgude on hunger strike at 5th day)
बुधवारी जुना आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत १००८ महामंडलेश्वर शिवगिरी महाराज यांनी उपोषणस्थळी भेट देऊन वाल्मीक बोरगुडे यांचा सन्मान केला. या वेळी त्यांनी बोरगुडे यांच्याशी संवाद साधला. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह परिसरातील महिला, विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उपोषणस्थळी येऊन पाठिंबा दिला.
निफाडच्या प्रांताधिकारी हेमांगी पाटील, तहसीलदार शरद घोरपडे, तलाठी शंकर खंडागळे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन ‘तुमच्या भावना आम्ही शासनापर्यंत कळविल्या असून, तुम्ही उपोषण सोडावे’, अशी विनंती केली.
दिवसभरात राजेंद्र मोगल, दिगंबर गिते, विलास मत्सागर, अण्णा बाबा महाराज, डॉ. रोहित धोक्रट, डाॅ. हेमंत मंडलिक, डॉ. योगेश परदेशी, डॉ. नितीन धारराव, डॉ. नारायण लोखंडे, डॉ. रुपेश वाघ, राजू राणा, आरपीआयचे रवींद्र जाधव, संजय गायकवाड, वाघ, विनोद गायकवाड, सुरेश डांगळे, तुकाराम गांगुर्डे, जुना आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत शिवगिरी महाराज, कैलास रायते, भय्यासाहेब देशमुख, सचिन होळकर, कैलास तासकर, अजित सानप, राजेंद्र होळकर, अनिल सोनवणे, ॲड. रामनाथ शिंदे, ॲड. विजय मोगल, ॲड. पानगव्हाणे, ॲड. अमोल शिंदे, ॲड. श्रीकांत रायते, ॲड. प्रवीण ठाकरे, ॲड. सागर कापसे, ॲड. रामनाथ सानप, पत्रकार किरण आवारे, राहुल दवते, दिलीप कुंभार्डे, चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय जाधव, संचालक राजेंद्र दवते, रवींद्र पवार यांनी प्रत्यक्ष भेटून पाठिंबा पत्र दिले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.