कृषी आंदोलन स्थगित; यापुढे अधिक ताकदीने, संघटीत होऊन लढू!

कृषि विधेयकाच्या यशाचे श्रेय शहीद शेतकऱ्यांना समर्पित करण्यात आला.
Rakesh Tikait
Rakesh TikaitSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : केंद्र शासनाच्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात सुरु असलेले आंदोलन संयुक्त किसान मोर्चाने (United farmers Morcha) आज आंदोलन स्थगित करीत असल्याची अधिकृत घोषणा केली. या आंदोलनाच्या यशाचे श्रेय देशातील बुद्धीजीवी व सोशल मिडीयाला (Social Media) देण्यात आले आहे.

Rakesh Tikait
अन्य राज्यात ओबीसी आरक्षणासह निवडणुका, मग महाराष्ट्राशीच दुजाभाव का?

यासंदर्भात भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिक्कैत यांनी दिल्ली येथे ही घोषणा केल्याची माहिती या समितीचे सदस्य संदीप गिड्डे यांनी दिली. यासंदर्भात आंदोलनाच्या यशाचा जल्लोष शनिवारी सर्व धरणे स्थळावर तसेच टोल नाक्यावर केला जाणार आहे.

यासंदर्भात श्री. टिक्कैत म्हणाले, केंद्र सरकारने कोणालाही विश्वासत न घेता शेतकऱ्यांच्या विरोधात व त्यांची अडचण करणारे तीन कायदे परस्पर संसदेत मंजुर करून घेतला. अत्यंत घाईने मंजुर केलेल्या या कायद्यांची अधिसूचना त्याच रात्री काढण्यात आली. यामध्ये शेतकऱ्यांचे हित नव्हते. त्यामुळे त्याचे तीव्र पडसाद उमटले. राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेले दहा महिने हे आंदोलन सुरु होते. विविध प्रयत्न झाले मात्र सर्व शेतकरी अत्यंत कठीण परिस्थितीत देखील एकत्र राहिले. त्यांच्या संघटीतपणामुळे आंदोलन यशस्वी झाले. त्याचे पडसाद विविध स्वरूपात उमटले. त्याचा परिणाम म्हणूनच हे कायदे मागे घेण्यात आले.

Rakesh Tikait
आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसचाच झेंडा फडकवणार!

ते म्हणाले, हे आंदोलन आज स्थगित करण्यात आले. मात्र शेतकऱ्यांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. त्याबाबत सातत्याने पाठपुरावा व जनजागृती करण्यात येईल. त्यासाठी संयुक्त किसान मोर्चा यापुढे आणखी मजबूत केला जाणार आहे. संयुक्त किसान मोर्चाची पुढील बैठक येत्या १५ जानेवारीला दिल्लीत होईल.

आंदोलन स्थगितीची घोषणा करताना संयुक्त किसान मोर्चाने डॉक्टर, वकील, सोशल मिडिया, माध्यमं, कलाकार यांचे आभार संयुक्त किसान मोर्चाने केली आंदोलन स्थगितीची अधिकृत घोषणा करताना व्यक्त केले. आंदोलनाच्या यशाचा जल्लोष शनिवारी सर्व धरणे स्थळावर, टोल नाक्यावर केला जाणार आहे. संयुक्त किसान मोर्चा यापुढे आणखी मजबूत होईल. त्याला सर्व घटकांचा प्रतिसाद मिळेल , असा विश्वास व्यक्त केला. या आंदोलनाच्या यशाचे श्रेय शहीद झालेल्या शेतकऱ्यांना समर्पित करण्यात आली.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com