आमदार पावरा संतापले, वीस वर्षे झाली, जमिनीचे पैसे केव्हा मिळणार?

वीस वर्षापूर्वीच्या भूसंपादनाचे पैसे विभागात जमा मात्र शेतकऱ्यांना मिळेनात!
MLA Kanshiram Pavra
MLA Kanshiram PavraSarkarnama

शिरपूर : अनेर मध्यम प्रकल्पाच्या (Irrigation project) पाटचारीच्या भूसंपादनापोटी पाटबंधारे विभागाने महसूल विभागाकडे (Revenue Department) निधी जमा केला. मात्र अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नाही. शेतकऱ्यांना तत्काळ रक्कम जमा करावी अशी मागणी आमदार काशिराम पावरा (Kashiram Pawra) यांनी भूसंपादन विभागाकडे केली.

MLA Kanshiram Pavra
नारायण राणेंना दिलासा... धुळे न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

यासंदर्भात उप विभागीय अधिकारी प्रमोद भामरे यांच्याकडे ही मागणी केली. भाजपचे आमदार श्री. पावरा, जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील यांनी या अधिकाऱ्यांची भेट घेतली.

MLA Kanshiram Pavra
देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारले ईमेलवरील निमंत्रण!

पाटचारीसाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना द्यावयाच्या मोबदल्यापोटी एप्रिलमध्ये पाटबंधारे विभागाने दोनदा रक्कम महसूल विभागाकडे जमा केली. मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप पसरला असून पाटचारीतून पाणी न जाऊ देण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे जलवितरणाचा प्रश्न उद्भवण्याची भीती आहे. महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या असंतोषाची दखल घेऊन तातडीने रक्कम खात्यावर वर्ग करावी अशी मागणी आमदारांनी पत्रातून केली.

काय आहे प्रकार

२००२-०३ मध्ये अनेर मध्यम प्रकल्पाच्या चारींचे काम सुरु झाले. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया राबवण्यात आली. तेव्हापासून शेतकऱ्यांचा मोबदल्यासाठी संघर्ष सुरु होता. त्यात अनेकदा आत्मदहनाचे प्रयत्न, वादविवादही झाले. मोबदला मिळत नसेल तर चारीतील पाणी इंचभरही पुढे सरकू न देण्याचा इशारा देऊन तशी कृतीही करण्यात आली. आमदार अमरीशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली मार्चमध्ये शेतकऱ्यांनी पाटबंधारे कार्यालयावर मोर्चा काढला. त्यांना तातडीने मोबदला देण्याचे आश्वासन देण्यात आले.

एप्रिलमध्ये दहा नंबर चारीसाठी एक कोटी ४५ लाख रुपये तर चौदा नंबर चारीसाठी दोन कोटी ६९ लाख ८० हजार ४३१ रुपयांची मोबदल्याची रक्कम महसूल विभागाकडे जमा करण्यात आली. ती शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग व्हावी यासाठी आमदार पावरा यांचा पाठपुरावा सुरु आहे.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com