Maharashtra Politics : जिवावर उदार शेतकऱ्यांनी चक्क समृद्धी महामार्गच रोखला!

Farmers stopped generous traffic in Sinner on Samruddhi Highway-नगरच्या नेत्यांनी सिन्नरला मिळणारे निळवंडे धरणाचे पाणी रोखल्याने शेतकरी आक्रमक झाले.
Farmers agitation at Samruddhi Highway
Farmers agitation at Samruddhi HighwaySarkarnama
Published on
Updated on

अजित देसाई

Maharashtra Politics : सिन्नर तालुक्यातील लाभक्षेत्रातील गावांना निळवंडे (नगर) धरणातील पाणी मिळण्यात सातत्याने राजकीय अडथळे निर्माण केले जात आहेत. त्यामुळे हा भाग पाण्यापासून वंचित राहिला आहे. या हक्काच्या पाण्यासाठी आज हे शेतकरी जिवावर उदार झाले. त्यांनी चक्क मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरच अडवला. या अभूतपूर्व आंदोलनाने वाहनांच्या प्रचंड लांब रांगा लागल्या. (The Farmers of Sinner block the samruddhi Highway at Wavi on Water issue)

दुष्कळाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या (Maharashtra) अनेक भागात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सिन्नर (Nashik) आणि नगर (Nagar) जिल्ह्यातील शेतकऱ्यांतदेखील हा प्रश्न तीव्र झाला आहे. त्यामुळे आज या शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गावर रास्ता रोको केल्याने तो चर्चेचा विषय झाला.

Farmers agitation at Samruddhi Highway
Sharad Pawar Politics : ३ मंत्री, १३ आमदार निरुपयोगी, शेतकऱ्यांसाठी शरद पवारच आले धाऊन!

सिन्नरच्या मलढोन, सायाळे, दुसंगवाडी, पाथरे खुर्द पाथरे बुद्रुक व वारेगाव येथील शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले. जलसंपदा विभागाने सिन्नरच्या गावांसाठी नदी मार्गाने पाणी सोडले होते. मात्र, हे आवर्तन पाथरे, वारेगावपर्यंत देण्याची शेतकऱ्यांची मागणी होती. याबाबत गेले काही दिवस नेत्यांत राजकीय वाद सुरू आहे. स्थानिक आमदार, खासदार यांनी याबाबत गाजावाजा करीत तोडगा काढल्याचा दावा केला होता. मात्र, प्रत्यक्षात ते मृगजळ ठरले.

सिन्नर तालुक्यात यंदा दुष्काळ आहे. निळवंडे धरणाच्या पाण्यामुळे तालुक्याच्या पूर्व भागातील जनावरांच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता होती. त्यासाठीच शेतकरी आवर्तनासाठी आक्रमक झाले होते. त्यांनी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर सायाळे शिवारात शेकडोच्या संख्येने एकत्र येत शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गावरची वाहतूक रोखून धरली.

शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. सकाळी अकराला रास्ता रोको करण्यात आला. पोलिसांनी लगतच्या ठाण्यांतील कुमक मागविली होती. दंगा नियंत्रण पथकाची विशेष प्लाटूनदेखील आंदोलनस्थळी दाखल झाली होती.

या आंदोलनाची नाशिकचे जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलिस अधीक्षकांना माहिती देण्यात आली. निळवंडे प्रकल्पाचे व जलसंपदा विभागाचे अधिकारी आंदोलनस्थळी आल्यावर झालेल्या चर्चेनंतर शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्ग रोखण्याचा निर्णय मागे घेतला.

Farmers agitation at Samruddhi Highway
Nagar Political News : भाजप युवा मोर्चाकडून प्रियांक खर्गेंना 'जोडे'...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com