लाडकी, लाडकी म्हणत, ऐन दिवाळीत फडणवीसांनी बहिणींना रस्त्यावर आणलं! आंदोलनकर्त्या महिलांनी सरकारविरोधात रस्त्यावर बांगड्या फोडल्या

Farmers Women Angry Over MMRDA's And Mahayuti Government : आगामी कुंभमेळ्यासाठी त्रंबकेश्वर रस्त्याचे तीस मीटर रुंदीकरण करण्यात येणार आहे. यासाठी 'एमएमआरडीए'ने वडिलोपार्जित जमिनी शेतकऱ्यांकडून घेतल्या आहेत.
Farmers Women Protest Trimbakeshwar Road; CM Devendra Fadnavis And DCM Eknath Shinde
Farmers Women Protest Trimbakeshwar Road; CM Devendra Fadnavis And DCM Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर रस्ता 30 मीटर रुंदीकरणाचे काम सुरू आहे.

  2. एमएमआरडीएकडून वडिलोपार्जित जमिनी घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी रस्ता आडवून निषेध केला.

  3. शेतकऱ्यांनी चटणी-भाकर खात काळी दिवाळी साजरी करत सरकारचा निषेध नोंदवला.

Kumbhmela News : 'एमएमआरडीए'कडून त्रंबकेश्वर रस्त्याचे रुंदीकरण होणार आहे. हे रुंदीकरण आता वादाचा विषय बनले आहे. अधिकाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेवर शेतकऱ्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित करत आंदोलन केले आहे. यामुळे आता आगामी कुंभमेळ्याच्या आधी त्रंबकेश्वरमध्ये नक्की काय सुरू आहे, असा सवाल आता अनेकांना पडू लागला आहे.

आगामी कुंभमेळ्यासाठी त्रंबकेश्वर रस्त्याचे तीस मीटर रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांना कोणताही मोबदला न देता स्वतःच्या जमिनीतून उसकावण्याचे कारस्थान आहे. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कारवाईला आठवडाभर स्थगित करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सूचना देऊनही एमएमआरडीए कडून त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे. दिवाळी शेतकरी स्वतःच्याच जमिनीतून आणि घरातून बेदखल होत आहेत. त्यामुळे या विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधण्यात आले आहे.

Farmers Women Protest Trimbakeshwar Road; CM Devendra Fadnavis And DCM Eknath Shinde
Devendra Fadnavis travel : मुख्यमंत्र्यांनी अनुभवला यातनादायी खड्डेमय प्रवास; गडकरींना जमलं नाही ते फडणवीस करून दाखवणार का?

येथील शेतकरी आणि महिलांनी काल रस्त्यावर बसून रस्ता रोको केला. रस्त्यावरच चट्टी भाकरी खाऊन दिवाळीचा सण साजरा केला. सगळीकडे दिवाळी असताना हे शेतकरी मात्र स्वतःच्याच जमिनीतून बेदखल झाल्याने त्यांनी 'काळी दिवाळी' साजरी केली. तसेच राग व्यक्त करत आंदोलनकर्त्या महिलांनी रस्त्यावर बांगड्या देखील फोडल्या.

उद्या भाऊबीज आहे. मात्र सरकारने निवडणुकीत मते घेण्यासाठी लाडकी लाडकी म्हणून महिलांना फसवले. आता सत्तेत आल्यावर या लाडक्या बहिणीला भाऊबीजेच्या आणि दिवाळीच्या सणालाच रस्त्यावर आणले आहे, अशी प्रतिक्रिया आंदोलनकर्त्या महिलांनी व्यक्त केली आहे.

'एमएमआरडीए' ही संस्था ग्रामपंचायत आणि कायद्यापेक्षा मोठी झाली आहे का? असा प्रश्न गोकुळ महाले यांनी केला. या संस्थेच्या अधिकाऱ्यांनी दडपशाही करून शेतकऱ्यांना त्यांच्या घरातून बाहेर काढले. शेकडो वर्ष या वडीलोपार्जित जमिनीत शेतकरी राहत आहे. त्यांना कोणतीही सूचना न देता रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली बेघर केले जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

जिल्ह्यात चार मंत्री आणि सर्वोच्च सर्व आमदार सत्ताधारी महाविकास आघाडीचे आहे. आमदार हिरामण खोसकर यांनी या आंदोलनात भाग घेतला. मात्र शेतकऱ्यांना दिलासा देण्यात ते कमी पडले आहेत. त्यामुळे सत्ताधारी पक्षावर आणि विशेषता मुख्यमंत्र्यांविषयी या शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

Farmers Women Protest Trimbakeshwar Road; CM Devendra Fadnavis And DCM Eknath Shinde
CM Devendra Fadnavis Targets NCP-Shivsena : राष्ट्रवादी-शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला भाजपचे जोरदार हादरे, फडणवीसांनी अहवाल बघताच उमेदवारही ठरला?

FAQs :

1. त्र्यंबकेश्वर रस्ता रुंदीकरणावर शेतकरी का नाराज आहेत?
शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित जमिनी एमएमआरडीएकडून घेतल्या गेल्याने त्यांना योग्य भरपाई न मिळाल्याची नाराजी आहे.

2. हा रस्ता किती मीटरने रुंद होणार आहे?
हा रस्ता 30 मीटर रुंदीकरण करण्यात येणार आहे.

3. शेतकऱ्यांनी आंदोलन कसे केले?
शेतकऱ्यांनी रस्ता आडवून आणि चटणी-भाकर खात काळी दिवाळी साजरी करून सरकारचा निषेध केला.

4. रस्ता रुंदीकरणाचे कारण काय दिले गेले आहे?
आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत करण्यासाठी हे रुंदीकरण करण्यात येत आहे.

5. सरकारकडून शेतकऱ्यांच्या मागण्यांवर काही निर्णय झाला आहे का?
सध्या चर्चेचा टप्पा सुरू असून अधिकृत निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com