राजेंद्र त्रिमुखे -
Ahmednagar Politics : खर्डा गावाचा योग्यप्रकारे विकास व्हावा यासाठी ग्रामपंचायत विभाजनाचा मुद्दा हाती घेतला होता. त्यानुसार यापूर्वी झालेली ग्रामसभा व मासिक सभेत हा मुद्दा उचलून धरला होता. मात्र, याला काही ग्रामपंचायत सदस्यांनी विरोध केल्याने रविवारी विरोधी सदस्यांच्या भूमिकेविरुद्ध खर्डा शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले होते.
जामखेड तालुक्यातील खर्डा(Kharda) ग्रामपंचायतचे विभाजन व्हावे यासाठी सोमवारी रोजी घेण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत ग्रामपंचायतच्या सर्वच १७ सदस्यांनी 'ग्रामपंचायत विभाजन मान्यतेच्या ठरावा'ला आपला पाठिंबा दिला असून ग्रामसभेचा महत्त्वाचा मुद्दा असणारा विभाजनाचा प्रश्न सोमवारी मार्गी लागला.
केवळ जामखेड तालुक्याचेच नव्हे तर जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतलेल्या खर्डा ग्रामपंचायत विभाजनाचा ठराव सर्वानुमते ग्रामपंचायत(GramPanchyat)ग्रामसभेत ठराव मंजूर करून सदस्यांनी सह्या केल्या व तेरा सदस्यांनी आपले मत व्यक्त करून ग्रामपंचायत विभाजनाला आमचा पाठिंबा आहे असे ग्रामस्थांसमोर स्पष्ट सांगितले.
खर्डा येथील काही युवकांनी खर्डा गाव आणि त्याचबरोबर ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट असलेल्या सहा गावांच्या विकासात अडथळे येत असल्याने गावाचा योग्य प्रकारे विकास व्हावा यासाठी ग्रामपंचायत विभाजनाचा मुद्दा हाती घेतला आहे. मात्र, त्याला काही ग्रामपंचायत सदस्यांनी विरोध केल्याने खर्डा शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले होते.
गावातील तरुणांनी खर्डा ग्रामपंचायत विभाजनाचा ठराव अचानकपणे ग्रामसभेत मांडला होता. १७ ग्रामपंचायत सदस्यांपैकी १४ ग्रामपंचायत सदस्यांनी ठरावाला पाठिंबा असल्याचे ग्रामस्थांसमोर उभे राहून सांगितले होते. यासंदर्भात पुन्हा ग्रामपंचायत कार्यालयात मासिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १६ ग्रामपंचायत सदस्य उपस्थितीत होते. त्यापैकी सत्ताधारी गटाच्या ग्रामपंचायत सदस्यांनी निवडणुकीच्या एक वर्षे अगोदर खर्डा ग्रामपंचायत विभाजनाचा निर्णय घेण्याचा विषय मीटिंगमध्ये मांडला होता.
सोमवारी ग्रामसभेत या ग्रामस्थांच्या मागणीला १७ सदस्यांनी ग्रामपंचायत विभाजनाला पाठिंबा दिला व ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यावेळी १७ सदस्यांपैकी १३ सदस्य उपस्थित होते व ४ सदस्य गैरहजर होते तरी या १३ सदस्यांनी आपले एक मत जाहीर करून ग्रामपंचायत विभाजनाला पाठिंबा दिला.
पाठिंबा देणारे १३ सदस्य:
वैभव जमकावळे, सुनिता दीपक जावळे, महेश दिंडोरे ,संजीवनी वैजनाथ पाटील , रोहिणी प्रकाश गोलेकर, महालिंग कोरे , पुनम अशोक खटावकर, दैवशाला सखाराम काळे, सोपान गोपाळघरे , शितल सुग्रीव भोसले, मदन पाटील, श्रीकांत लोखंडे
गैरहजर सदस्य:
नमिता आसाराम गोपाळघरे, सीमा भगवान दराडे, कांचन गणेश शिंदे, नवनाथ होडशीळ
आमदार राम शिंदेंच्या माध्यमातून खर्ड्या'चा विकास करू
ग्रामपंचायत विभाजनाला आमचा पाठिंबा होता व आज आम्ही सर्व सदस्य सर्वानुमते ग्रामस्थांच्या मागणीनुसार ग्रामपंचायत विभाजनाला मंजुरी दिली आहे. आता आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांच्या नेतृत्वाखाली काम करून त्यांना योग्य ती मदत करेल व गावाचा सर्वांगीण विकास करेल अशी ग्वाही सरपंच संजीवनी वैजनाथ पाटील यांनी ग्रामसभेत दिली.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.