Dr. Vikhe Patil News : वाळू तस्करांना दणका, महसूलमंत्र्यांनी घेतला `हा` निर्णय!

Revenue Officers fine sand mafia and Seniors waive off it- महसूल मंत्री डॉ. विखे पाटील यांनी उच्चस्तरीय समिती नेमण्याची घोषणा केली.
Dr. Radhakrishna Vikhe Patil
Dr. Radhakrishna Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

Sand Mafia News : महसूल अधिकारी वाळू माफीयांना दंड करतात. त्यावर वरिष्ठ महसूल अधिकारीच वाळू माफीयांचा दंड माफ करतात, हे होते तरी कसे. याबाबतच्या अनेक तक्रारी असल्याने याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करण्यात येऊन ठोस उपाय करण्यात येतील, अशी माहिती महसूल मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. (Umakant Dangat will lead a three member committee on Revenue Officers)

विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासा आमदार बाबाजानी दुर्राणी (Babajani Durrani) यांनी वाळू माफीयांविषयी प्रश्न विचारला होता. त्यावर महसूल (Revenue) मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील (Dr. Radhakrishna Vikhe Patil) यांनी ही माहिती दिली.

Dr. Radhakrishna Vikhe Patil
Collector Transfer : जलज शर्मा झाले नाशिकचे नवे जिल्हाधिकारी!

परभनी येथील वाळूतस्करी आणि अवैध खणन याविषयी आमदार दुर्राणी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी परभनीसह विविध जिल्ह्यातील वाळूमाफीयाच्या प्रश्नांवर चर्चा झाली. अन्य सदस्यांनी देखील यावेळी चर्चेत भाग घेतला.

वाळू तस्करीत कारवाई करण्यात येते. त्यात महसूल अधिकारी ही कारवाई करतात. दंड आकारला जातो. नियमानुसार ही कारवाई झाल्यावर वाळू तस्कर त्यावर वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांकडे अपील करतात. त्यात ते अधिकारी संबधीतांचा दंड माफ करतात. म्हणजेच एक अधिकारी कारवाई करतो, दंड करतो आणि दुसरा महसूल अधिकारी तो दंड माफ करतो, हा सावळा गोंधळ राज्याच्या अनेक जिल्ह्यात घडल्याच्या तक्रारी आहेत. दहा ते अकरा जिल्ह्यांत असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे त्याची सविस्तर चौकशी करून अहवाल देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Dr. Radhakrishna Vikhe Patil
NMC News : तीन महिन्यांनी मिळाले आयुक्त, हे आयुक्त नवे महापालिका आयुक्त!

महसूल मंत्री म्हणाले, या प्रकरणांची गंभीर दखल घेण्यात आली आहे. त्यासाठी उमाकांत दांगट या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तीन अनुभवी अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करण्याचा निर्णय झाला आहे. हे अधिकारी त्याबाबत अहवाल सादर करतील. येत्या आठ दिवसांत ही समिती नियुक्त केली जाईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com