Food Supply at Irshalwadi Landslide: दुर्घटनास्थळी मोफत शिवभोजन थाळीचे वाटप करणार!

Food and supply Minister Chhagan Bhujbal orders to collector for Food supply -अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना तातडीचे आदेश.
Food and Supply Minister Chhagan Bhujbal
Food and Supply Minister Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal News : रायगडमधील इर्शाळगड येथे दरड कोसळण्याची घटना काल (बुधवारी) मध्यरात्री घडली. यात सात जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत विविध स्तरावर दु:ख व्यक्त होत आहे. याबाबत विधीमंडळात देखील चर्चा झाली. (State government will avail free shivbhojan food packets to disaster struck)

रायगडच्या इर्शाळवाडी येथे झालेल्या दुर्घटनास्थळी मोफत शिवभोजन थाळीचे पॅकेट वाटप करण्यात येणार असल्याचा निर्णय राज्याचे (Maharashtra Givernment) अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जाहीर केला आहे.

Food and Supply Minister Chhagan Bhujbal
Irshalwadi Landslide Incident: इर्शाळवाडीवर दरड कोसळली ; शंभरहून अधिक लोक अडकल्याची भीती; दहा जणांचा मृत्यू

इर्शाळवाडी येथे झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रालयातील दालनात अन्न, नागरी पुरवठा विभागच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली आणि तातडीने मदत पुरविण्याचे आदेश दिले

आजूबाजूच्या शिवभोजन केंद्रावरून हे पॅकेट देण्यात येणार आहे. शिवाय ५ लिटर रॉकेल, १० किलो तांदूळ, १० किलो गहू किंवा त्याचे पीठ, तूरडाळ, तेल, साखर देखील देण्यात येणार असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केले आहे.

Food and Supply Minister Chhagan Bhujbal
Nashik Politics: आमदारांच्या घोषणांचा गडगडाट... तिजोरीत खडखडाट !

जोपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत हा पुरवठा सुरूच राहणार असल्याचे सांगतानाच छगन भुजबळ यांनी रायगड जिल्हाधिकारी यांना तातडीने याबाबतचे आदेश दिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com