Asif Shaikh Politics : आसिफ शेख अद्वय हिरेंच्या मदतीला, दादा भुसेंवर केले गंभीर आरोप!

Serious allegations against Dada Bhuse पालकमंत्री दादा भुसे यांनी मतदारसंघातील आपल्या विरोधकांना संपवण्यासाठी कटकारस्थान केले.
Asif Shaikh and dada Bhuse
Asif Shaikh and dada BhuseSarkarnama
Published on
Updated on

Adway Hire News: शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांना नऊ महिन्यांनंतर जामीन मिळाला. जामीनावर बाहेर येताच त्यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केले. यावेळी त्यांनी पालकमंत्री दादा भुसे यांचे सगळेच काढले होते. अद्वय हिरे यांना जामीन मिळाला. ते कारागृहातून बाहेर येताच मालेगावचे नेते, माजी आमदार असिफ शेख यांनी त्यांची पाठराखण केली. माजी आमदार शेख शिवसेना उपनेते हिरे यांच्या मदतीला धावून आले आहेत.

यावेळी त्यांनी पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यावर गंभीर आरोप करीत सत्तेचा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवला आहे. असिफ शेख यांनी मंत्री भुसे यांना थेट सवाल केला. अद्वय हिरे यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला आहे. तसेच प्रकार जिल्हा बँकेत अनेक संचालकांनी केले आहेत.

बँकेचे माजी पदाधिकारी, आमदार, खासदार आणि जिल्ह्याच्या नेत्यांवर असेच आरोप आहेत. जिल्हा बँकेने त्या नेत्यांवर काय कारवाई केली? एकट्या अद्वय हिरे यांच्या यांच्या विरोधातच बँकेकडून गुन्हा दाखल का करण्यात आला?

अद्वय हिरे (Advay Hire) यांच्या विरोधात त जो गुन्हा दाखल आहे त्या गुन्ह्यामध्ये खरोखर काही तथ्य आहे का? अद्वय हिरे यांच्याकडे त्याबाबतचे अनेक पुरावे असतील. योग्य वेळी ते हे पुरावे जनतेपुढे मांडतील. पालकमंत्री भुसे यांनी आपल्या मालेगाव बाह्य मतदार संघातील विरोधकांना संपविण्याचे मोठे षडयंत्र केले, हे स्पष्ट झाले आहे. यांना कारागृहात डांबण्यात आले. त्यामुळे काही प्रमाणात मंत्री भुसे त्यात यशस्वी झाले,असे म्हणता येईल.

Asif Shaikh and dada Bhuse
Mahant Ramgiri Maharaj : वादग्रस्त वक्तव्य,गुन्हा दाखल, छत्रपती संभाजीनगरमध्ये तणाव; रामगिरी महाराजांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

अनेक कार्यकर्त्यांवर अशाच राजकीय दबाव आणला जात आहे. अनेकांना धमकावले जात आहे. विरोधकांच्या कार्यकर्त्यांना अनेक प्रकारे त्रास दिला जातो आहे. हे सर्व जनतेच्या डोळ्यादेखत घडत आहे. याचा काय अर्थ निघतो? हे वेगळे सांगण्याची गरज नाही, असे माजी आमदार शेख म्हणाले. ते म्हणाले, हे सर्व घडले तरी उच्च न्यायालयाने हिरे यांना न्याय दिला आहे. मी उच्च न्यायालयाचे आभार मानतो. योग्य तो न्याय आता जनतेने देखील करावा, अशी आपली अपेक्षा आहे.

मालेगाव बाह्य मतदारसंघात विकास कामांच्या नावाखाली प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. ठराविक लोकांनी हा भ्रष्टाचार केला. कोट्यावधीची माया जमवली आहे. आज युवकांना रोजगार नाही. भ्रष्टाचाराने हा मतदारसंघ पोखरला गेला आहे. ठराविक ठेकेदारांनी त्यात करोडो रुपये कमावले आहे. त्यात कोणीही स्थानिक ठेकेदार नाही. याबाबत मालेगाव बाह्यचे मतदार योग्य निर्णय घेतील. अशा भ्रष्टाचारी लोकांना धडा शिकवतील. याबाबत मला शंका वाटत नाही.

Asif Shaikh and dada Bhuse
Nashik Hindu March : 'त्या' एक तासात काय घडले?, पोलिस आणि जमावाचा पाठशिवणीचा खेळ !

मालेगाव बाह्यच्या मतदारांनी आता जागरूक होऊन सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्या नेत्यांना घरी बसवावे. यात ते नक्कीच योग्य निर्णय घेतील. याबाबत मला शंका वाटत नाही, असेही माजी आमदार असिफ शेख म्हणाले. शिवसेना उपनेते हिरे यांना जामीन मिळाला. त्यामुळे आता मालेगाव बाह्य मतदारसंघाची राजकीय समीकरणे देखील अतिशय वेगाने बदलू लागली आहेत. माजी आमदार शेख हे हिरे यांच्या मदतीला धावून आले आहेत.

विधानसभा निवडणुकीत देखील काय घडेल यासाठी तो सूचक इशारा आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीबाबत मालेगाव बाह्य मतदारसंघात भुसे यांच्या विरोधकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे, हे स्पष्ट होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com