Mahant Ramgiri Maharaj : वादग्रस्त वक्तव्य,गुन्हा दाखल, छत्रपती संभाजीनगरमध्ये तणाव; रामगिरी महाराजांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Nashik Gangiri Maharaj Saptah : रामगिरी महाराजांवर येवला आणि वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकीकडे त्यांच्या वक्तव्यावरुन मुस्लिम समाजातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गिरीश महाजन हे महंत रामगिरी महाराजांची भेट घेतली.
Mahant Ramgiri Maharaj.jpg
Mahant Ramgiri Maharaj.jpgSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या वक्तव्याचे मोठे तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर येथे मुस्लिम समाज आक्रमक झाला असून महंत रामगिरी महाराजांच्या वक्तव्या विरोधात एकवटला आहे.

रामगिरी महाराजांवर येवला आणि वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकीकडे त्यांच्या वक्तव्यावरुन मुस्लिम समाजातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि मंत्री गिरीश महाजन हे महंत रामगिरी महाराजांची भेट घेतली आहे.

नाशिक येथील सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये सत्संगाच्या कार्यक्रमात बोलताना महंत रामगिरी महाराज एका समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे.या वक्तव्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक शहरात वातावरण तापलं आहे.

गुन्हा दाखल झाल्यावर महंत काय म्हणाले..?

येवला आणि वैजापूर येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर आता सरला पीठाचे महंत रामगिरी महाराज यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले, त्या वक्तव्यामागचा उद्देश हिंदूंनी संघटित राहावे एवढाच होता. पण आम्ही जे बोललो ते बोललो. त्याच्या परिणामांना सामोरे जाण्याची आमची तयारी आहे. आमच्यावर गुन्हा दाखल झाला असेल तर नोटीस येईल तेव्हा आम्ही बघू. आता सप्ताह सुरु आहे. आम्ही हा सप्ताह झाल्यानंतर पुढे बघू असेही महंत रामगिरी महाराज (Mahant Ramgiri Maharaj) यांनी सांगितले.

Mahant Ramgiri Maharaj.jpg
Video Sunil Shelke Emotional : भावूक सुनील शेळकेंना सुनील तटकरेंनी सावरले; मावळात नेमके काय घडले?

बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार केले जात आहेत.तसेच एक ते दीड कोटीवर लोकं बॉर्डरवर उभे आहेत.भारतामध्ये प्रवेश मागत आहेत.त्यावर हिंदूंनी मजबूत राहिले पाहिजे.अन्यायाला प्रतिकार केला पाहिजे एवढीच आपण प्रतिक्रिया दिली असल्याची भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली. या सप्ताहामध्ये 20 ते 25 लाख लोक येथे एकत्र येत असतात.त्यांना भक्ती मार्गाला आणण्याचं काम आम्ही करतो असेही रामगिरी महाराज म्हणाले.

आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गिरीश महाजन हे थोड्याच वेळात गंगागिरी महाराज यांच्या सप्ताहाला भेट घेतली आहे. या सप्ताहात महंत रामगिरी महाराजांची भेट घेण्यावरुन नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.

Mahant Ramgiri Maharaj.jpg
Election Commission News: बच्चू कडू अन् प्रकाश आंबेडकरांच्या पक्षांचं ठरलं; 'या' चिन्हावर विधानसभा लढणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com